घरलाईफस्टाईलपावसाळ्यात डोक खूप खाजतयं, मग वापरा 'हे' घरगुती हेअर मास्क

पावसाळ्यात डोक खूप खाजतयं, मग वापरा ‘हे’ घरगुती हेअर मास्क

Subscribe

पावसाच्या दिवसांमध्ये डोके का खाजते.? याचा आपण कधी विचार केला आहे का ? अशातच केसांमध्ये कोंडा झाल्यास, उवा झाल्यास, डोक्याच्या त्वचेला घाम आल्यास, डोक्याची त्वचा कोरडी पडल्यास, केमिकल युक्त शाम्पूच्या अति वापरामुळे केस कोरडे पडून डोके खाजवू शकते. डोक्याला सतत खाज येत असेल तर कोणत्याच गोष्टीमध्ये मन लागत नाही.

पावसाळ्यात ही समस्या अधिक वाढते. डोक्यात खाज येण्याची कारणे बरीच असू शकतात. मात्र, केसांच्या मुळाशी असलेला कोरडेपणा यामुळे खाजेची समस्या अधिक असते. केसांच्या मुळांशी असलेला कोरडेपणा घालवला नाही तर कोंड्याची समस्या सुरू होते. कोंड्यावर योग्य उपचार केले नाहीत तर मायक्रोबायल इन्फेक्शन होऊ शकते. यासाठी केसांचा स्काल्प कधीच कोरडा होऊ देऊ नका. या घरगुती उपायांनी तुम्ही डोक्याला येणारी खाज थांबवू शकता.

- Advertisement -

10 Simple Home Remedies for an Itchy Scalp & Hair | Head and Shoulders IN

लिंबाचा रस

डोक्याला खाज येत असल्यास लिंबाच्या रसाचा वापर करा. दोन-तीन चमचे लिंबाचा रस कापसावर घ्या. आणि त्यानंतर हा लिंबाचा रस टाळूवर लावा आणि दहा मिनिटे राहू द्या. नंतर कोमट पाण्याने डोके धुऊन टाका. लिंबाच्या रसात अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे डोक्याची खाज बंद होण्यासाठी मदत मिळेल.

- Advertisement -

कोरफडीचा गर व खोबरेल तेल

कधी कधी डोक्याची त्वचा कोरडी पडल्यामुळे खाज येत असते. अशावेळी खोबऱ्याचे तेल किंचित गरम करून मालीश करा. खोबऱ्याचे तेल उत्कृष्ट मॉइश्चरायझर आहे. त्याचा प्रभाव थंड असतो. ज्यामुळे खाजेपासून मुक्तता मिळते. कोरफडीच्या गराचा वापर केस सुंदर, मजबूत तसेच डॅंड्रफ फ्री करण्यासाठी केला जातो. डोक्याला येणारी खाज थांबवण्यासाठी केसांच्या मुळापाशी कोरफडीचा गर लावून हलक्या हाताने चोळा. असे केल्याने कोंडा नाहीसा होऊन खाज येणे बंद होईल.

व्हिनेगरचा उपयोग

डोक्याला येणारी खाज थांबवण्यासाठी ॲपल सायडर व्हिनेगरचा उपयोग करता येऊ शकतो. एक चमचा ॲपल सायडर व्हिनेगर कपभर पाण्यात मिसळून कापसाच्या मदतीने डोक्याच्या त्वचेवर लावा. १५ मिनिट राहू द्या. नंतर थंड पाण्याने धुऊन घ्या. असे केल्याने डोक्याला येणारी खाज बंद होईल.

बेकिंग सोडा

डोक्याला येणारी खाज थांबवण्यासाठी बेकिंग सोडा आणि पाण्याचे मिश्रण टाळूवर लावा. १५ मिनिट राहू द्या. नंतर थंड पाण्याने धुऊन घ्या. असे केल्याने डोक्याला येणारी खाज बंद होण्यास मदत मिळेल. केसांची तसेच केसांखाली असलेल्या त्वचेची स्वच्छता न राखल्याने खाज येते. म्हणून केस वेळच्या वेळी धुण्याची सवय लावा.

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईल गरम करून कोमट होऊ द्या. हे तेल डोक्याच्या त्वचेवर लावून चांगली मालीश करा. हे तेल रात्रभर राहू द्या आणि सकाळी धुऊन घ्या.


हेही वाचा :

Monsoon : पावसाळ्यात केस गळतात? ‘या’ टिप्स करा फॉलो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -