Sunday, April 21, 2024
घरमानिनीबिझनेस वुमन बनायचं? मग 'या' गोष्टी लक्षात घ्या

बिझनेस वुमन बनायचं? मग ‘या’ गोष्टी लक्षात घ्या

Subscribe

आजच्या बदलत्या काळात अनेक महिला नोकरी करण्यापेक्षा बिझनेस करण्याचा जास्त विचार करतात. अनेक महिलांनी व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकून स्वतःचा वेगळं अस्थित्व सुद्धा सिद्ध केलंय. तुम्ही सुद्धा बिझनेस वूमन बनण्याचा विचार करत असाल तर, त्याआधी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. व्यवसायात यश मिळविण्यासाठी केवळ नेतृत्त्व गुणवत्तेच्या जोरावर तुम्ही बिझनेस वुमन बनू शकत नाही. यासाठी स्वतःवर आत्मविश्वास आणि तुम्ही अनेक स्किल्स शिकणे महत्वाचे असते.

बिझनेस आयडिया क्लिअर ठेवा –
जर तुम्हाला यशस्वी बिझनेस वूमन बनायचे असेल तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाची कप्लना स्पष्ट असायला हवी. अनेक वेळा आपण इतरांच्या यशाने इतके प्रभावित होतो की, आपणही तोच व्यवसाय सुरु करण्याचे निर्णय घेतो. पण, असे करण्याआधी तुम्हाला हा व्यवसाय करण्यात स्वारस्य आहे का? याचा विचार करणे गरजेचे आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे व्यवसायात गुंतवणुकीसाठी आवश्यक असलेल्या भांडवलाबद्दल, त्याची जोखीम आणि बाजारपेठेबद्दल देखील पुरेशी माहिती मिळाल्यास, कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याची शक्यता बऱ्यचा प्रमाणात कमी होते.

- Advertisement -

छोट्या स्केलपासून सुरवात करा –
व्यवसायाची सुरुवात आपण किती मोठ्या प्रमाणावर केली यावर त्याचे यश अवलंबून नसते. त्यामुळे तुम्ही जर व्यवसाय क्षेत्रात नवीन असाल तर तुमचा व्यवसाय छोट्या प्रमाणावर सुरु करण्याचा विचार करा. कारण, जेव्हा तुम्ही कमी भांडवल गुंतवता, तेव्हा नुकसानही कमीच होते. कालांतराने, तुम्हाला व्यवसायाशी निगडित अनुभव येऊ लागतात, जे तुम्हाला बिझनेस वुमन बनविण्यासाठी फायद्याचे ठरतात.

कर्ज घेण्याची तयारी ठेवा –
तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी कर्ज घेणार असाल तर त्यापूर्वी विविध बँकेत जाऊन त्याची चौकशी अवश्य करा. तुम्हाला कोणत्या बँकेत किती व्याज द्यावे लागेल याची संपूर्ण माहिती आधीच काढून घ्या. यासाठी तुम्ही एखाद्या चार्टर्ड अकाउंटची मदत घेऊ शकता.

- Advertisement -

ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग गरजेचे –
तुम्हाला तुमच्या व्यवसायात ठसा उमटवायचा असेल आणि उद्योगतेच्या जगात टिकून राहायचे असेल तर चांगली उत्पादने आणि चांगल्या सेवेसोबतच तुम्हाला तुमच्या व्यवसायचे ब्रॅण्डिंग आणि मार्केटींगकडे लक्ष द्यावे लागेल.

बिझनेससाठी असणाऱ्या सरकारी योजना –

पत हमी योजना –

लघु उद्योगांसाठी MSME मंत्रालयाची क्रेडिट गॅरंटी योजना 5 कोटी रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज प्रदान करते.

प्रधानमंत्री मुद्रा योजना –

प्रधानमंत्री मुद्रा योजना योजना 2015 मध्ये व्यापाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यतचे तारण मुक्त कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. यात तीन श्रेणीमध्ये कर्ज वाटप केले जाते. येथे कर्जाची परतफेड करण्यासाठी कमाल कालावधी 5 वर्ष इतका आहे आणि किमान कालावधी 3 वर्षे आहे.

महिला समृद्धी योजना –

महिला समृद्धी योजनेअंतर्गत महिलांना व्याज सवलतीसह 1,40,000 पर्यंत आर्थिक मदत दिली जाते. नियमानुसार, मागास समाजातील महिला आणि ज्यांचे कुटुंब उत्पन्न वर्षाला 3 लाखांपेक्षा कमी आहे ते या योजनेसाठी कर्ज काढण्यास पात्र असतात.

 

 


हेही वाचा : Loneliness : आयुष्यात एकटेपणा जाणवतोय? फॉलो करा ‘या’ टिप्स

 

- Advertisment -

Manini