घरमहाराष्ट्रपुणेChandrakant Patil : वसतिगृह न मिळालेल्या मुला-मुलींना महिन्याला मिळणार सहा हजार!

Chandrakant Patil : वसतिगृह न मिळालेल्या मुला-मुलींना महिन्याला मिळणार सहा हजार!

Subscribe

राज्यातील राजकारणात उलथापालथी होत असतानाच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असलेले मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुढील शैक्षणिक सत्र 1 जूनपासून उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यातील सर्व मुलींची शंभर टक्के फी राज्य सरकार भरणार आहे.

सोलापूर : राज्य सरकारने राज्यातील मुला-मुलींसाठी मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे मुला- मुलींना महाविद्यालयाचे, शासकीय वसतिगृह मिळालेले नाही अशांना सरकार निर्वाह भत्ता देणार आहे. महानगरात राहणाऱ्यांमा 6 हजार, तर इतर शहरात राहणाऱ्या दरमहा 5 हजार 300 रुपये तर तालुका पातळीवर 3 हजार 800 प्रति महिना भत्ता दिला जाणार असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटल यांनी दिली. (Chandrakant Patil Boys and girls who do not get hostel will get six thousand per month)

राज्यातील राजकारणात उलथापालथी होत असतानाच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असलेले मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुढील शैक्षणिक सत्र 1 जूनपासून उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यातील सर्व मुलींची शंभर टक्के फी राज्य सरकार भरणार आहे. महाराष्ट्रातील मुलींना फी नसल्यामुळे शिकता येत नाही असे होणार नाही. मुलींच्या फीसाठी आम्ही 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करणार आहोत. मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये याबाबतचा निर्णय झाला असून, लवकरच कॅबिनेटचा निर्णय होऊन जीआर निघणार आहे. त्याचबरोबर ज्या मुला-मुलींना वसतिगृह मिळालेले नाही अशांना निर्वाह भत्त्याची तरतूद करण्यात येणार आहे.

- Advertisement -

असा मिळणार निर्वाह भत्ता

राज्यातील मुला-मुलींना राज्य सरकारकडून आगामी शैक्षणिक क्षेत्रापासून निर्वाह भत्ता दिल्या जाणार आहे. यामध्ये महानगरातील विद्यार्थी-विद्यार्थीनीना दरमहा 6 हजार, त्यापेक्षा लहान शहरांमध्ये 5 हजार 300 तर तालुका स्तरावर 3 हजार 800 रुपये प्रति महिना निर्वाह भत्ता मिळणार आहे. या निर्णयामुळे शिक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल अशी आशा आहे. हा भत्ता डिबीटीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात देण्यात येणार आहे.

हेही वाचा : Rahul Narwekar : “द. मुंबईत भाजपाचाच खासदार”, लोकसभा निवडणुकीबाबत नार्वेकरांची स्पष्ट भूमिका

- Advertisement -

राज्यातील विद्यापीठांसाठी कोट्यवधीचा निधी

राज्यातील मुला-मुलींविषयी निर्वाह निधीची घोषणा केल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पीएम उच्चस्तर शिक्षा अभियानाच्या माध्यमातून देशातील विद्यापीठांना 3 हजार 800 कोटी रुपये निधी दिला आहे. तर महाविद्यालयांना 5 हजार कोटी रुपये जाहीर होणार आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील तेव्हा ज्या विद्यापीठामध्ये शंभर कोटींपेक्षा अधिकचा निधी वापरला जाईल. त्या ठिकाणी मोदींना आम्ही बोलवणार आहोत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -