घरक्राइमNagpur Crime : फोटोग्राफरची गोळ्या झाडून हत्या; नागपुरात नेमकं चाललंय तरी काय?

Nagpur Crime : फोटोग्राफरची गोळ्या झाडून हत्या; नागपुरात नेमकं चाललंय तरी काय?

Subscribe

नागपुरात एकाची गोळ्या घालून हत्या झाल्याची घटना घडली आहे. घरात घुसून काहींनी गोळ्या झाडल्या आहेत. विनय पूनेकर अस मृतकाच नाव असून, मृतक हा प्रेस फोटोग्राफर असल्याची माहिती मिळत आहे. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नागपुरातील सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजनगर या भागात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे नागपुरात एकच खळबळ उडली आहे.

नागपूर : राज्यात मागील काही दिवसांपासून गोळीबारीच्या घटना घडत असल्याचे चित्र आहे. कल्याण, मुंबईतील गोळीबारीच्या घटनांनी राज्याचे लक्ष वेधलेले असतानाच आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातून गोळीबारीची घटना समोर आली आहे. नागपूरमधील सदर पोलीस स्टेशन हद्दीत एका फोटोग्राफरची घरात जाऊन गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने नागपुरात नेमकं चाललं तरी काय ? असा प्रश्न निमित्ताने विचारल्या जात आहे. (Nagpur Crime Photographer shot dead What is really going on in Nagpur)

नागपुरात एकाची गोळ्या घालून हत्या झाल्याची घटना घडली आहे. घरात घुसून काहींनी गोळ्या झाडल्या आहेत. विनय पूनेकर अस मृतकाच नाव असून, मृतक हा प्रेस फोटोग्राफर असल्याची माहिती मिळत आहे. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नागपुरातील सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजनगर या भागात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे नागपुरात एकच खळबळ उडली आहे.

- Advertisement -

सायलेन्सर लावलेल्या पिस्टलने झाडल्या गोळ्या

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेस फोटोग्राफर असलेले विनय पूनेकर हे घरी एकटे असताना अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरी आला. त्या अज्ञाताने सायलेन्सर लावलेल्या पिस्टलने त्यांच्यावर गोळ्या झाडून तेथून पळ काढला. मृतक पूनेकर यांना प्रेस फोटोग्राफर म्हणून काम सोडून अनेक वर्षे झाले आहेत. दरम्यान त्यांच्या घरात घुसून काहींनी गोळ्या झाडून त्यांची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

हेही वाचा : Devendra Fadnavis : “याचे क्रडिट अजित दादांनाच”, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

- Advertisement -

परिसरात बघ्यांची गर्दी

नागपुरात भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. पुनेकरांच्या घराबाहेर आता मोठी गर्दी जमली आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून हत्येमागचं कारण शोधलं जात आहे. घटनास्थळी श्वान पथकालाही पाचरण करण्यात आलं आहे.

हेही वाचा : Raj Thackeray : “तुतारी मिळाली तर आता ती फुंका”, ठाकरेंचा पवारांना टोला

संशयीत पोलिसांच्या ताब्यात?

घटनेतील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याचीदेखील माहिती समोर येत आहे. आरोपी नेमका कोणत्या गाडीतून आला आणि त्याने गोळीबार का केला? याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -