Thursday, May 2, 2024
घरमानिनीHealthतुम्हाला दिवसभर जांभई येते का, मग हे आहेत 'या' आजाराचे लक्षण

तुम्हाला दिवसभर जांभई येते का, मग हे आहेत ‘या’ आजाराचे लक्षण

Subscribe

जांभई येणे , थकवा येणे या सामान्य गोष्टी आहेत. साउथ कॅरोलिनाच्या मेडिकल युनिव्हर्सिटीच्यामते जांभई येण्यामागे असे काही हार्मोन कारणीभूत असतात जे हार्ट रेट आणि अलर्टनेसला काही काळासाठी वाढवतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा थकलेले असता तेव्हा तुम्हाला अलर्ट करण्यासाठी जांभई येते. मात्र काही हेल्थ एक्सपर्ट्सनुसार जर एखादा व्यक्ती अधिक वेळा जांभई देत असेल तर ती गोष्ट सामन्य नाही.
खुप वेळा जांभई देणे हे एखाद्या आजार किंवा हेल्थ कंडिसनचे संकेत असू शकतात. त्याचसोबत पुढील काही समस्या सुद्धा उद्भवू शकतात.

-अनिद्रा

- Advertisement -


एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्याला खुप वेळ जांभई येत असेल तर त्यामागे अनिद्रता हे कारण असू शकते. ही गोष्ट सर्वांमध्ये सामान्य असते. मात्र काही प्रकरणांमध्ये ती स्लीप एपनिया किंवा अनिद्रेचे सुद्धा कारण असू शकते. स्लीप एपनिया एक संभाव्यरुपात गंभीर स्लीप डिसऑर्डर आहे.

या व्यतिरिक्त जर तुम्ही जोरात घोरता किंवा पुरेशी झोप जरी झाली तरीही थकवा जाणवतो. त्यामुळे सुद्धा स्लीप एपनिया होऊ शकतो. अनिद्रतेच्या समस्येमुळे झोप पूर्ण होत नाही आणि यासाठी सुद्धा काही कारणे कारणीभूत असू शकतात.

- Advertisement -

-मेडिकेशन


जर एखादा व्यक्ती अधिक प्रमाणात औषधं घेत असतील तर त्याला सुद्धा वारंवार जांभई येत राहते. काही एंटीसाइकोटिक्स किंवा एंटीडिप्रेसेंटच्या साइड इफेक्टमुळे सुद्धा जांभई येते. त्यामुळे तुम्ही प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणतीही औषध घेऊ नका. नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

-ब्रेन डिसऑर्डर


खुप वेळ जांभई देणे ब्रेन डिसऑर्डरचे सुद्धा संकेत असू शकतात. पार्किंसंस डिसीज, मल्टीपल स्केलेरोसिस आणि माइग्रेन डोकेदुखी सारख्या स्थितीत सुद्धा जांभई येऊ शकते.

-एंग्जायटी किंवा स्ट्रेस


हेल्थ एक्सपर्ट्सनुसार अत्याधिक जांभई देणे किंवा स्ट्रेसच्या कारणास्तव सुद्धा येऊ शकतात. याकडे सुद्धा तुम्ही लक्ष दिले पाहिजे की, वेळेसह एंग्जायटी किंवा स्ट्रेसचे कारण ठरु शकतात.


हेही वाचा- दुपारच्या जेवणानंतर झोप येते? जाणून घ्या कारण

 

- Advertisment -

Manini