Thursday, April 25, 2024
घरमानिनीBeautyMakeup Tricks : पातळ ओठांवर असा करा लिप मेकअप

Makeup Tricks : पातळ ओठांवर असा करा लिप मेकअप

Subscribe

शरीराच्या सौंदर्यातला मुख्य भाग म्हणजे चेहरा (face). चेहऱ्याला आकर्षक बनवताना त्याच्यावरच्या सर्वच फीचर्सचा विचार करणं गरजेचं आहे. ओठ (lips) त्यापैकीच एक महत्त्वाचा भाग. पातळ ओठांवर लिपस्टिक लावणे आव्हानापेक्षा कमी नाही. पातळ ओठ पाउटी आणि जाड दिसण्यासाठी आजकाल अभिनेत्री सर्जरीचा अवलंब करत आहेत. प्रत्येकासाठी शस्त्रक्रिया करणे ही सोपी गोष्ट नाही, याचसाठी आज आम्ही तुम्हाला पातळ ओठांवर लिपस्टिक लावण्यासाठी कोणत्या चांगल्या टिप्स आहेत हे सांगणार आहोत.

लिप लायनर (lip liner)
न्यूड किंवा न्यूड गुलाबी शेडचं लीप लायनर तुमच्या ओठांसाठी वापरा. या लीप लायनरनं ओठांना आऊटलाईन द्या. यामुळे ओठ भरून दिसतील.

- Advertisement -

लिप बाम लावा
जेव्हा तुम्ही लिप मेकअप करत नसाल तेव्हा ओठांवर लिप बाम लावण्याची सवय लावा. लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप बाम किंवा मॉइश्चरायझर लावा. लिप लाइनरने लिप मेकअप सुरू करा. ओठ थोडे जाड दिसण्यासाठी बाहेरच्या दिशेने आउटलाइन करा. नंतर, त्यावर हलकेच स्मज करा. आता खालच्या ओठांवर थोडा गडद रंग लावा. वरच्या ओठावर त्यापेक्षा थोडा हलका रंग. यानंतर लिप ब्रशने लिप कलर ब्लेंड करा.

हायलाइटर वापरा (highlighting)
ओठांच्या मध्यभागी म्हणजेच क्यूपिड बो वर थोडेसे हायलाइटर लावा, यामुळे ओठ थोडे जाड दिसतील. बोटाने हायलाइटर लावा आणि ब्लेंड करा, जेणेकरून ते वेगळे चमकणार नाही. शेवटी लिप ग्लॉस लावायला विसरू नका, त्यामुळे ओठ मोठे दिसतात.

- Advertisement -

ओठांवर कन्सीलर लावा (Concealer)
कन्सीलर जे मुली डाग लपवण्यासाठी वापरतात. हेच कन्सीलर ओठांनाही वापरु शकता. यासाठी लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांच्या मध्यभागी वरच्या बाजूला कन्सीलर लावा. नंतर बाहेरील कडांवर लावा. कारण यामुळे तुमचे ओठ भरलेले दिसण्यास मदत होते.

ग्लॉसी लिपस्टिक (Glossy Lipstick)
तुमचे ओठ मोकळे दिसण्यासाठी ग्लॉसी लिपस्टिक निवडा. कारण यामुळे तुमचे ओठ मॅट लिपस्टिकपेक्षा अधिक फुलतील. जर तुमचे ओठ पातळ असतील तर गडद लिपस्टिक वापरणे टाळा.

- Advertisment -

Manini