Saturday, April 27, 2024
घरमानिनीBeautyवॅक्सिंगमुळे त्वचेवर पिंपल्स येतात? फॉलो करा या टिप्स

वॅक्सिंगमुळे त्वचेवर पिंपल्स येतात? फॉलो करा या टिप्स

Subscribe

सुंदर दिसण्यासाठी स्त्रिया विविध उपाय करत असतात. त्यापैकी एक म्हणजे वॅक्सिंग. वॅक्सिंग करण्यासाठी अनेक जणी पार्लरचा पर्याय निवडतात तर काही जणी घरीच करतात. पण, अनेक वेळा वॅक्सिंग केल्यावर त्वचेवर पुरळ अथवा पिंपल्स उठण्याची समस्या उदभवते किंवा वॅक्सिंग केल्यावर त्वचेवर रॅशेस दिसू लागतात. अशावेळी या समस्येतून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो करण्याची गरज असते.

वॅक्सिंगनंतर कोरफड लावा – जर तुम्हाला वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर पिंपल्स उठण्याची समस्या जाणवत असेल तर वॅक्सिंगनंतर एलोवेरा जेलचा वापर करा. असे केल्याने त्वचेला आराम तर मिळेलच शिवाय त्वचेवरील लालसरपणाही कमी होईल. पिंपल्स आले असतील तर तेही कमी होतील.

- Advertisement -

वॅक्सिंगनंतर बर्फ चोळा – बऱ्याचवेळा असे घडते की वॅक्स जास्त गरम असल्याने त्वचेवर लालसरपणा दिसतो. यावर उपाय म्हणून तुम्ही बर्फाचे तुकडे वापरू शकता. पण तुम्हाला ते थेट त्वचेवर लावायचे नाहीत हे लक्षात घ्या. तुम्ही बर्फाचे तुकडे कापडावर ठेवा आणि मग त्वचेवर लावा.

- Advertisement -

साखरेचा स्क्रब – वॅक्सिंगनंतर त्वचेवर येणारे पुरळ आणि जळजळ कमी करण्यासाठी घरात तयार केलेला साखरेचा स्क्रब तुम्ही वापरू शकता. हे स्क्रब तयार करण्यासाठी अर्धा कप ऑलिव्ह ऑइल किंवा नारळाच्या तेलामध्ये अर्धा कप साखर मिक्स करून घ्या. तयार मिश्रण त्वचेजवर लावा आणि हलक्या हाताने स्क्रब करा.

कॉटन – वरील कोणतेच उपाय शक्य नसल्यास एक साधा आणि सोपा मार्ग तुम्ही अवलंबवू शकता. कॉटनचे स्वच्छ कापड पाण्यात भिजवून ओले करा आणि हातापायांवर ठेवा. यामुळे त्वचेला थंडावा मिळेल. तसेच त्वचेचा लालसरपणा आणि पुरळ देखील कमी होण्यास मदत मिळेल.

लेझर उपचार – त्वचेवर पुरळ उठल्यामुळे त्वचा खराब दिसू लागते अशा वेळी लेझर उपचार तुम्ही करू शकता पण त्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

 

 

 

 


हेही वाचा : त्वचा निरोगी ठेवण्यासाठी लावा मँगो फेसपॅक

 

- Advertisment -

Manini