घरदेश-विदेशShivshakti Point: चांद्रयान-3 लँडिंग साइट आता अधिकृतपणे 'शिवशक्ती पॉइंट'; खगोलशास्त्रीय संघाने दिली...

Shivshakti Point: चांद्रयान-3 लँडिंग साइट आता अधिकृतपणे ‘शिवशक्ती पॉइंट’; खगोलशास्त्रीय संघाने दिली मान्यता 

Subscribe

नवी दिल्ली:चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगने जगभरातील देशांच्या अंतराळ संस्थांना आश्चर्यचकित केले होते. यशानंतर 26 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-3 च्या लँडिंग साइटला ‘शिवशक्ती पॉइंट’ असे संबोधले. 19 मार्च रोजी इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने (IAU) या नावाला मान्यता दिली. या यशानंतर तीन दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्कमधील शास्त्रज्ञांची भेट घेतली. (Shivshakti Point Chandrayaan 3 landing site now officially Shivshakti Point Approved by the Astronomical Union)

चांद्रयान-3 14 जुलै रोजी प्रक्षेपित 

चांद्रयान-3 14 जुलै 2023 रोजी प्रक्षेपित करण्यात आले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून LVM3-M4 रॉकेटवरून हे प्रक्षेपण करण्यात आले. विक्रम लँडरने 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:04 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवले होते. त्याची एकूण किंमत 615 कोटी रुपये आहे. इस्रोने यापूर्वीच चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांनी चांद्रयान-1 आणि चांद्रयान-2 चंद्राच्या दिशेने पाठवले. चार वर्षांपूर्वी इस्रोने चांद्रयान-2 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लँडिंगच्या काही वेळापूर्वीच त्याचा बेंगळुरू येथील इस्रोच्या नियंत्रण केंद्राशी संपर्क तुटला.

- Advertisement -

चांद्रयान-3 सोबत एकूण 7 पेलोड पाठवण्यात आले

चांद्रयान-3 सोबत 7 पेलोड पाठवण्यात आले. चांद्रयान-3 च्या प्रोपल्शन मॉड्यूलवर SHAPE नावाचा पेलोड बसवण्यात आला होता. चंद्राच्या कक्षेत फिरून पृथ्वीवरून येणाऱ्या किरणोत्सर्गाचा तपास करण्यासाठी ते तयार करण्यात आले होते. लँडरवर तीन पेलोड होते.

पर्यायी लँडिंग सुविधेसह सुसज्ज 

इस्त्रोने चाचणीदरम्यान ठरवले होते की, जर एक जागा लँडिंगसाठी योग्य वाटली नाही तर दुसरी जागा तयार केली जाईल. चांद्रयान-3 ला लक्ष्यित ठिकाणाहून पुढे मागे नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. एक किलोमीटरच्या परिघात सुरक्षितपणे उतरता येईल, हे आधीच ठरवले होते. चांद्रयान-3 साठी सपाट जागा निवडण्यात आली होती. कारण त्या वेळी कोणताही घटक आडवा आला तरी चांद्रयानाचा समतोल ढासळला जाऊ नये.

- Advertisement -

2019 च्या चांद्रयान-2 मोहिमेतून घेतले धडे

चांद्रयान-3 च्या आधी 22 जुलै 2019 रोजी चांद्रयान-2 लाँच करण्यात आले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करणारी ही कोणत्याही देशाची पहिली अंतराळ मोहीम होती.  चांद्रयान-2 मोहिमेचे विक्रम लँडर 6 सप्टेंबर 2019 रोजी चंद्रावर क्रॅश झाले.

इस्रोच्या शास्त्रज्ञांनाही या मोहिमेतून खूप काही शिकायला मिळाले. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले की 2019 ची चांद्रयान-2 मोहीम अंशतः यशस्वी झाली होती, परंतु त्यातून मिळालेले अनुभव चंद्रावर लँडर उतरवण्याच्या इस्रोच्या नवीन प्रयत्नात खूप उपयुक्त ठरले. या अंतर्गत चांद्रयान-3 मध्ये अनेक बदल करण्यात आले.

(हेही वाचा: Jitendra Awhad: श्रीकांत शिंदेंना कल्याणमध्ये पाडण्याचा अजितदादांचा डाव; आव्हाडांचा गंभीर आरोप)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -