घरमहाराष्ट्रMahayuti : महादेव जानकर महायुतीसोबत; पवारांशी केवळ चर्चाच

Mahayuti : महादेव जानकर महायुतीसोबत; पवारांशी केवळ चर्चाच

Subscribe

मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर हे अनेक दिवस राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या संपर्कात होते. महायुतीपासून दुरावून ते मविआत जातील असा अंदाज होता. परंतु महादेव जानकर यांनी यु टर्न घेतला आहे. ते आता महाविकास आघाडीत जाणार नाहीत तर महायुतीचेच घटकपक्ष राहणार आहेत. त्यांच्या पक्षाला एक जागाही मिळणार आहे. महायुती परभणीची जागा महादेव जानकरांसाठी सोडणार असल्याची चर्चा आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची जानकर यांची इच्छा होती, आणि महाविकास आघाडी त्यांच्यासाठी ही जागा सोडण्यास तयार होती. खुद्द शरद पवार यांनी तशी तयारी दाखविली होती. याच अनुषंगाने महादेव जानकर आणि शरद पवार यांची भेटही झाली होती. मात्र, या निमित्ताने होणाऱ्या सगळ्या चर्चा आणि शक्यता मोडून काढत आपण महायुतीसोबतच राहणार असल्याचे जानकर यांनी रविवारी जाहीर केले आहे. तसे निवेदनही त्यांनी प्रसिद्ध केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maha Politics : भाजपाचा आमच्यावर दबाव…, लोकसभा उमेदवारीबाबत संजय शिरसाटांचे भाष्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेअंती जानकर यांनी आपण महायुती सोबतच राहणार असल्याचे ठामपणे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भाजपा आमदार प्रसाद लाड हे देखील यावेळी उपस्थित होते. महायुतीकडून जानकर यांना लोकसभा निवडणुकीत एक जागा देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.

- Advertisement -

संयुक्त निवेदन प्रकाशित

महादेव जानकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर महायुतीच्या नेत्यांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झालाय आणि त्यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, त्यामुळे आपण मोदीजी यांच्यासोबत आहोत, असं महादेव यांनी बैठकीत सांगितलं. या बैठकीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तिनिशी सोबत राहू, असंही महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. या निवदेनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महादेव जानकर यांचीही सही आहे.

दरम्यान, एकीकडे शरद पवार यांच्यासोबत बैठकांचा सपाटा सुरू असताना महादेव जानकर यांनी अचानक यू-टर्न घेत महायुतीसोबत राहण्याचं पसंत केल्याने महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

हेही वाचा – Jitendra Awhad: श्रीकांत शिंदेंना कल्याणमध्ये पाडण्याचा अजितदादांचा डाव; आव्हाडांचा गंभीर आरोप

सुनील तटकरे काय म्हणाले ?

“राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत सविस्तर चर्चा केली. जानकर यांनी महायुतीमध्ये राहणार असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. महायुतीची एक जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीचे जागावाटप होईल त्यावेळी त्यांना कुठला मतदारसंघ देण्यात आला आहे, ते जाहीर केले जाईल. महादेव जानकर यांच्यामुळे महायुती अधिक बळकट होईल. ४५ पेक्षा जास्त जागांचे उद्दिष्ट आहे. त्याला ताकद मिळेल.”

अजित पवारांची एक जागा होणार कमी?

महादेव जानकर यांना एक जागा देण्याच आली आहे. ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातून दिली गेल्याचे सांगण्यात येत आहे. महादेव जानकर यांना शरद पवार यांनी माढाची जागा देण्याची तयारी दर्शवली होती. पण, महायुतीने आधीच डाव साधला आहे. आता जानकर यांना माढाची जागा देण्यात येते की परभणीची हे बघावे लागले. पण, मिळालेल्या माहितीनुसार जानकर यांना परभणीतूनच उमेदवारी देण्याची शक्यता जास्त आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -