Saturday, April 27, 2024
घरमानिनीBeautyकेस काळे आणि मऊशार करण्यासाठी मेहंदी आहे बेस्ट

केस काळे आणि मऊशार करण्यासाठी मेहंदी आहे बेस्ट

Subscribe

पावसाळा सुरू झाला असून सर्वत्र हिरवळ पसरली आहे. यात मेहंदीच्या पानाचे खास महत्त्व आहे. श्रावणमध्ये महिला श्रृंगार करून दोन्ही हातात मेहंदी लावतात. पण, मेहंदीचे महत्व केवळ सौंदर्यापुरते मर्यादीत नाही. मेहंदी ही तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. खासकरून महिला या मेहंदी केसांना लावून त्यांच्या चांगला रंग येतो पण, मेहंदी फक्त केसांना रंग देत नाही तर तुमच्या केसांच्या स्कॅल्पसाठी देखील फायदेशीर आहे.

श्रावणात रिमझिम पाऊस आणि ह्यूमिडिटी जास्त असते. यामुळे तुमच्या केसांची स्कॅल्प संबंधित समस्याचा सामना करावा लागतो. यावेळी मेहंदीचा वापर हा तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर होऊ शकतो. मेहंदी ही तुमच्या केसांच्या स्कॅल्पसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही मेहंदी तुमच्या केसांना कशी लावा आणि त्यांचे फायदे आज सांगणार आहोत.

- Advertisement -

केसांसाठी मेहंदींचे ‘हे’ आहेत फायदे

आयुर्वेदामध्ये मेहंदी ही उपचारासाठी वापरली जाते. नेशनल लायब्रेरीनुसार, मेहंदीमध्ये एंटीफंगल गुण आहेत. मेहंदीच्या वापरामुळे तुमच्या केस गळणे आणि कोरडेपणा सारख्या समस्यासोबत मायक्रोबियल समस्या असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरते. मेहंदी ही तुमचे केस पांढरे होऊ देत नाही, असे पब मेड सेंट्रलने सांगितले आहे.

- Advertisement -

रिसर्च गेटने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, मेहंदीच्या पानात एंटीमायक्रोबॉयल प्रॉपर्टी आहे. यामुळे तुमच्या स्कॅल्पचे आरोग्य चांगले राहण्यास फायदेशीर आहे. यात बॅक्टीरिया आणि फंगस स्कॅल्पमध्ये होणाऱ्या इनफेक्शन पसरवण्यास रोखते. कारण, पावसाळ्यात जास्त ह्यूमिडिटी असते आणि यामुळे इंफेक्शन होण्याचा धोका अधिक असतो.

मेहंदीमध्ये व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात असतो. यामुळे केस मऊ होण्यास मदत करते. मेहंदीच्या पानांमध्ये प्रोटीन आणि एंटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असतो. यामुळे तुमच्या केसांचे स्वास्थ चांगले राहते.

कोण-कोणत्या पद्धतीन मेहंदी वापरू शकता

मेहंदी आणि मुलतानी माती

तुमच्या स्कॅल्प तेलकट असेल आणि तुमचे केस गळत असतील, तर तुमच्यासाठी मेहंदी चांगला पर्याय आहे. मेहंदी तुमच्या केसांना रंग देते आणि त्यासोबत तेलकट स्कॅल्पच्या समस्येसाठी देखील फायेदशीर आहे. यामुळे तुमचे केस सिल्की आणि मऊ होतात.

अशी करा अप्लाय

  • एका भांड्यात दोन चमचे मुलतानी माती, दोन चमचे मेहंदी पावडर यांची पेस्ट तयार करा
  • यात तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी टाका आणि चांगले मिक्स करून घ्या.
  • हे तुम्ही तुमच्या केसांवर लावा आणि यात स्कॅल्पवर देखील ही पेस्ट लावून घ्या.
  • जवळपास 2 तास ही मेहंदी ठेवा आणि नंतर पाण्यांनी केस धुवून घ्या

मेहंदी आणि ग्रीन टी

मेहंदी आणि ग्रीन टी या दोन्हीचे मिश्रण केवळ केसांचे सौंदर्य वाढवत नाही, तर तुमच्या केसांच्या वाढीसाठी देखील चांगला उपाय आहे.

अशी करा अप्लाय

  • एक कप मेहंदी पावडरमध्ये एक कप ग्रीन टी मिक्स करा आणि हे दोन्ही चांगले मिक्स करून घ्या.
  • तुम्ही तुमच्या गरजेनुसार घट किंवा पातळ करू शकता
  • हे मेहंदीचे मिश्रण रात्री तयार करून ठेवा.
  • सकाळी यात अर्धा लिंबू पिळून टाका आणि चांगले मिक्स करा
  • ही मेहंदी केसांवर 30 मिनिट ठेवा आणि नंतर केस धुवून घ्या
  • मेहंदी आणि ग्रीन टीचे मिश्रण महिन्यातून एकात तुम्ही तुमच्या केसांना लावा

मेहंदी आणि केळ

जर तुमचे स्प्लिट एंड्स आहेत आणि तुमचे केस खूप कोरडे असतील, तर तुम्ही मेहंदी आणि केळीची पेस्ट बनवून केसांना लावू शकता. हे तुमच्या केस हे मऊ आणि रेशमी होतात. तसेच केसांना एक वेगळीच चमक येते.

अशी करा अप्लाय

  • एक कप मेहंदी पावडर आणि केळ टाका
  • हे मिश्रण चांगले मिक्स करू घ्या
  • हे मिश्रण तुम्ही तुमच्या केसांवर अप्लाय करून 20 ते 25 मिनटे लावू ठेवा.
  • यानंतर मायल्ड शैंपूने तुम्ही तुमचे केस धुवून घ्या

हेही वाचा – ‘या’ गोष्टीमुळे केस अकाली होतात पांढरे

 

- Advertisment -

Manini