घरताज्या घडामोडीLive Update : जम्मू काश्मीर नॅशनल फ्रंट (JKNF) वर 5 वर्षांची बंदी

Live Update : जम्मू काश्मीर नॅशनल फ्रंट (JKNF) वर 5 वर्षांची बंदी

Subscribe

जम्मू काश्मीर नॅशनल फ्रंट (JKNF) वर 5 वर्षांची बंदी

गृह मंत्रालयाने बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायद्यांतर्गत जेकेएनएफच्या विरोधात केली कारवाई

- Advertisement -

12/3/2024 22:23:27


ड्रग्ज तस्करी प्रकरणी 6 जणांना अटक, 480 कोटींचे ड्रग्ज जप्त

- Advertisement -

आरोपींना अरबी समुद्रातून अटक

गुजरात एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलाची कारवाई

सर्व आरोपी पाकिस्तानचे असल्याची माहिती

12/3/2024 18:54:43


काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, 43 उमेदवारांचा समावेश

12/3/2024 18:21:42


मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

जयश्री पाटील, गुणरत्न सदावर्ते, शंकर लिंगे व राजाराम पाटील यांनी मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती देण्यासाठी जनहित याचिक दाखल केली होती

12/3/2024 17:36:0


शरद पवार 17 मार्च रोजी शिवाजी पार्कवर होणाऱ्या काँग्रेसच्या सभेला उपस्थित राहणार

12/3/2024 16:49:32


बोरिवलीतील कल्पना चावला चौकात निर्माणाधीन इमारतीमध्ये लोखंडी मचाण कोसळली

तीनजण जागीच ठार, एकाची प्रकृती गंभीर

12/3/2024 16:19:37


तेजस विमानाचा जैसलमेरमध्ये अपघात; विमान जळून खाक

12/3/2024 15:5:1


पत्रकारांशी संवाद साधताना वसंत मोरे भावूक

12/3/2024 14:33:18


काँग्रेस खासदार राहुल गांधी महाराष्ट्रात दाखल

12/3/2024 14:26:48


वसंत मोरे यांचा मनसेला जय महाराष्ट्र

राज ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र करत वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र

12/3/2024 13:11:11


12/3/2024 13:11:11


भाजप लोकसभेत 150 जागा पार करू शकत नाही – नाना पटोले

12/3/2024 12:5:5


हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा

मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडून राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द

लोकसभेपूर्वी हरियाणात मोठा राजकीय भूकंप

मुख्यमंत्र्यांसोबतच हरियाणाचे मंत्रिमंडळही राजीनामा देण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीत हरियाणाच्या जागावाटपावर एनडीए आघाडीत अद्याप एकमत नाही

भाजप-जेजेपी युती तुटण्याची शक्यता

12/3/2024 11:45:2


संजय राऊत माध्यमांना खोटं ब्रिफिंग करतात – प्रकाश आंबेडकर

जागावाटपाचा वाद महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात – प्रकाश आंबेडकर

जागा वाटप होत नाही याच कारण वंचित आघाडी नाही – प्रकाश आंबेडकर

महाविकास आघाडीने आधी त्यांच्यातला वाद मिटवावा ही आमची मागमी – प्रकाश आंबेडकर

12/3/2024 11:5:36


मध्य रेल्वेच्या वाशिंद-आसनगावदरम्यान रेल्वे रुळाला तडा

कसाराकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प

12/3/2024 10:28:22


गुजरात आणि महाराष्ट्रातही एकता मॉलचे उद्घाटन – पंतप्रधान नरेंद्र मोदी

100 वर्षात पहिल्यांदा असा कार्यक्रम होत असून विकसीत भारतासाठी होत असलेल्या नवनिर्माणाचा विस्तार होत आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवीन योजना सुरू होत आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

जर 2024 बाबत बोललो तर या 75 दिवसांत 11 लाख कोटींपेक्षा जास्त विकासकामांचे लोकार्पण झाले – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आज पण विकसीत भारताच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आज 85 हजार कोटींचे रेल्वेचे प्रकल्प मिळाले आहेत. त्यामुळे आज रेल्वेच्या कार्यक्रमात पेट्रोलियमचाही कार्यक्रम घेण्यात आला आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

वोकल फॉर लोकलच्या मिशनसाठी हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

12/3/2024 9:53:50


शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर

राळेगाव आणि पुसद येथे त्यांची जाहीर सभा होणार

12/3/2024 8:5:51


कोस्टल रोड आजपासून मुंबईकरांसाठी वाहतुकीसाठी खुला


साताऱ्यात वाळू माफियांची ८० वाहने जप्त, ४.४१ कोटींचा दंड; खनिकर्म विभागाची कारवाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -