Saturday, April 27, 2024
घरमानिनीBeautyBeauty Tips : स्किन केअरसाठी पपई बेस्ट

Beauty Tips : स्किन केअरसाठी पपई बेस्ट

Subscribe

उपवासाच्या दिवसांत बर्‍याच स्त्रिया आपल्या आहारात फळांचा जास्त समावेश करतात. दरम्यान उपवासाच्या वेळी जेव्हा आपण पपई आणता तेव्हा तिचे साल टाकून देऊ नका. कारण सौंदर्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पपईमध्ये आढळणारे पपाइन नावाचे एन्झाईम्स शरीरात केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर सौंदर्य सुधारण्यासही मदत करतात. पपईची साल त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया पपईची साले त्वचेसाठी कशी फायदेशीर ठरतात.

मृत त्वचा काढण्य़ासाठी
फक्त पपईच नाही तर त्याची सालं देखील त्वचा सुधारण्यास मदत करतात. त्यात पॅपेन एन्झाइम असते जे त्वचेवर स्क्रब म्हणून काम करते आणि टॅनिंग किंवा प्रदूषणामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचेचा थर काढून टाकते . डेड स्किन काढण्यासोबतच त्वचेला उजळ प्रभावही देतो.

- Advertisement -

वृद्धत्व रोखण्यासाठी पपई फायदेशीर
पपईमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट घटक असतात, जे त्वचेला दीर्घकाळ तरुण ठेवण्यास मदत करतात. आम्ही तुम्हाला सांगतो की यामध्ये व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-ई आढळतात, जे त्वचेला पोषण देण्यासोबतच हायड्रेट ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात.

मुरुम कमी होतात
संवेदनशील त्वचेसाठीही हे खूप फायदेशीर आहे. पपईच्या सालामुळे मुरुम कमी होण्यास मदत होते. हे त्वचेला कूलिंग इफेक्ट देण्याचे काम करते.

- Advertisement -

नको असलेल्या केसांची वाढ होणार कमी
पपईमध्ये आढळणारे पपाइन एंजाइम नको असलेल्या केसची वाढ कमी करते. जर आपल्याला चेहऱ्यावरील केसांपासून सुटकारा हवा असेल तर पपईची साल किंवा लगदा दोघांचा वापर करा. पपईच्या सालीचा नियमित वापर केल्यास त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते.

पपईचा त्वचेसाठी कसा करा वापर?
चेहऱ्यासाठी आपण पपई फेस पॅकचाही उपयोग करू शकता. यासाठी पपईची पातळ पेस्ट करावी आणि चेहऱ्यावर लावावी. या पेस्टमध्ये तुम्ही मध आणि थोडेसे कच्चे दूध देखील मिक्स करू शकता. या फेस पॅकमुळे चेहरा चमकदार होतो. पण चेहऱ्यावर मुरुम असतील याचा उपयोग करणं टाळावे.

- Advertisment -

Manini