घरमहाराष्ट्रMaha Politics : अमरावतीचे राजकारण तापले, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ बंडाच्या तयारीत

Maha Politics : अमरावतीचे राजकारण तापले, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ बंडाच्या तयारीत

Subscribe

नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाल्यामुळे शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ज्यामुळे आता अमरावती लोकसभेचे वातावरण तापले आहे.

अमरावती : भाजपाकडून लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातून अमरावती लोकसभेच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण यामुळे महायुतीत मात्र, वादाची ठिणगी पडली आहे. कारण राणा यांच्या उमेदवारीला महायुतीत शिवसेना आणि प्रहार संघटनेकडून विरोध करण्यात आला होता. परंतु, या विरोधाला न जुमानता भाजपाने राणा यांच्या नावाची घोषणा केल्याने शिवसेना (शिंदे गट) नेते आनंदराव अडसूळ संतापले आहेत. तर अडसूळ पिता-पुत्र यामुळे बंड करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. (Maha Politics : Shiv Sena leader Anandrao Adsul is preparing for revolt after Navneet Rana was nominated)

हेही वाचा… Bacchu Kadu : दिव्यांग मंत्रालयाचा शब्द दिला नसता तर…, बच्चू कडूंनी यामुळे दिला शिंदेंना पाठिंबा

- Advertisement -

नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाल्यामुळे शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे मी माघार घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यांचा हाच विरोध थांबवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराव अडसूळ यांच्यात काल बुधवारी (ता. 27 मार्च) रात्री बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे यांनी अडसूळ यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आता अडसूळ काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

तर, आनंदराव अडसूळ हे स्वतः किंवा त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ या निवडणुकीत उडी घेणार असल्याचे म्हटले जात आहे. तशी तयारी अडसूळ पिता-पुत्रांनी चालू केली आहे. शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीतून समाधानकारक तोडगा न निघाल्यास अभिजित अडसूळ अपक्ष म्हणून ही निवडणूक लढू शकतात. मात्र, असे झाल्यास अडसूळ यांची ही एका प्रकारची बंडखोरीच असेल. ज्यामुळे, नवनीत राणा आणि महायुतीसाठी अमरावतीची निवडणूक कठीण जाऊ शकते. 2019 साली आनंदराव अडसूळ यांना नवनीत राणा यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हापासून अडसूळ आणि राणा हे राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे अडसूळ यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे.

- Advertisement -

नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आनंजराव अडसूळ यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले की, भाजपाने नवनीत राणा यांना दिलेली उमेदवारी ही राजकीय आत्महत्या आहे. महायुद्धात जापानने हाराकिरी केली. तेच भाजपने केले आहे. सर्व विरोधात असताना कशाच्या जीवावर नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली? बच्चू कडू नवनीत राणा यांच्या विरोधात आहे. पटेल विरोधात आहे. भाजपाचे पदाधिकार विरोधात आहे. त्यामुळे राणा यांना तिकीट देणे ही आत्महत्या ठरणार आहे, असे म्हणत अडसूळ यांनी संताप व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -