घरमहाराष्ट्रSanjay Raut : सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे उतरणार बारामतीच्या रिंगणात, राऊतांची...

Sanjay Raut : सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे उतरणार बारामतीच्या रिंगणात, राऊतांची माहिती

Subscribe

खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील बारामतीत प्रचाराच्या रिंगणात उतरतील, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून देण्यात आली आहे.

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान हे 19 एप्रिलला होणार आहे. यासाठी आता उमेदवारांची नावे देखील समोर येऊ लागली आहेत. महाराष्ट्रातही लोकसभेचे जोरदार वारे वाहात असून सध्या सर्वाधित टर्चा सुरू आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघाची. कारण या मतदारसंघात पहिल्यांदाच नणंद-भावजयीमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा… Jitendra Awhad : देश आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम होतोय, आव्हाड असे का म्हणाले?

- Advertisement -

बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. तर महायुतीकडूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. ज्यामुळे बारामतीत यंदा निवडणुकीला रंग चढणार आहे. ज्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील बारामतीत प्रचाराच्या रिंगणात उतरतील, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून देण्यात आली आहे. (Uddhav Thackeray will enter Baramati arena campaign for Supriya Sule, Sanjay Raut information)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (ता. 26 मार्च) प्रसार माध्यमांशी शिवसेना भवन येथे संवाद साधला. यावेळी त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीबाबत स्पष्ट भूमिका मांडली. याबाबत बोलताना ते म्हणाले की, सत्ताधाऱ्यांकडून माणसांना गळालाच लावण्याचे काम करण्यात येते. त्यांनी गळाला लावल्यानंतर माणसे गाळात जातात. महादेव जानकर यांच्याबाबत फारसे काही बोलता येणार नाही. कारण त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. पण बारामतीत सुप्रिया सुळे या विक्रमी मताधिक्याने जिंकून येतील, याच्याविषयी आमच्या मनात कोणतीही शंका नाही, असेही संजय राऊतांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

तसेच, सुप्रिया सुळे यांना भरघोस मताधिक्क्याने विजयी करण्यासाठी तिन्ही पक्ष आणि कार्यकर्ते-पदाधिकारी कामाला लागले आहेत. मी स्वतः शरद पवार यांच्यासोबत तीन जाहीर सभा घेतलेल्या आहेत. पण वेळ पडली तर उद्धव ठाकरे देखील बारामतीत जाऊन जाहीर सभा घेतील. त्यासोबतच कार्यकर्त्यांच्या बैठकाही घेण्यात येतील. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात यावेळी कोणीही आले तरी त्या प्रचंड मताधिक्क्याने जिंकून येतील, हे ठरलेले आहे,असा विश्वास राऊतांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे तेथून निवडणूक लढण्यास कोणीही तयार नाही. ज्यामुळे इतरांना गळाला लावण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहेत, असा टोलाही राऊतांकडून लावण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -