Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशNaxalite Encounter : छत्तीसगडमधील 8 तासांच्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांचा खात्मा

Naxalite Encounter : छत्तीसगडमधील 8 तासांच्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांचा खात्मा

Subscribe

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा जवान यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा जवानांकडून मोठी कारवाई करण्यात आली.

छत्तीसगड : देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यामुळे सुरक्षा व्यवस्था आता अलर्ट मोडवर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल मंगळवारी (ता. 02 एप्रिल) सुरक्षा दलाच्या जवानांनी सर्च मोहीम राबवली. त्यावेळी त्यांच्यावर काही नक्षलवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. यानंतर नक्षलवादी आणि सुरक्षा जवान यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा जवानांकडून मोठी कारवाई करण्यात आली. (Naxalite Encounter: 13 Naxalites killed by security forces in Chhattisgarh)

हेही वाचा… Ashok Chavan Nanded: जो मैं बोलता हूँ, वह करता हूँ; प्रचारसभेदरम्यान अशोक चव्हाणांची डायलॉगबाजी

- Advertisement -

01 एप्रिलच्या रात्री गंगालूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरात, एसटीएफ, कोबरा आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाकडून सर्च मोहीम राबविण्यात आली. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील गंगालूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही शोध मोहीम सुरू होती. परंतु, काल मंगळवारी (ता. 02 एप्रिल) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गंगालूर पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या कोरचोली परिसरातील जंगलात सुरक्षादलाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात अचानक चकमक सुरू झाली.

या चकमकीत सुरुवातीला आठ नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले. पण या चमकीनंतर घटनास्थळाच्या आसपासच्या परिसरात सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन केले असता एकूण 13 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आल्याची माहिती समोर आली आहे. आठ तासांच्या चकमकीत ही मोठी कारवाई करण्यात सुरक्षा दलातील जवानांना यश आले आहे. मंगळवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत सुरक्षा जवान आणि नक्षलवादी यांच्यामध्ये ही चकमक सुरू होती, अशी माहिती बिजापूरचे पोलीस अधिक्षक जितेंद्र यादव यांच्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

निवडणुकीच्या रणधुमाळीत एसटीएफ, कोबरा आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाकडून शोध मोहीम सुरू असताना सुरक्षा जवान लेंड्रा गावातील जंगलात पोहोचले. यावेळी जंगलात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी सुद्धा प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. या कारवाईत 13 नक्षलवादी ठार झाले आहेत. तसेच घटनास्थळी मोठा शस्त्रसाठा सुद्धा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा रिझर्व्ह गार्ड (डीआरजी), विशेष कार्य दल (एसटीएफ) आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या कोबरा बटालियनचे जवान सहभागी होते. या सर्वांनी संयुक्तपणे कारवाई केली आहे.

हेही वाचा… Naxalite Encounter : निवडणुकीच्या रणधुमाळीत नक्षलवादी आणि सुरक्षादलात चकमक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -