Tuesday, June 6, 2023
घर मानिनी Diary "फिल्म इंडस्ट्री सगळ्यांसाठी नाहीच", शहनाज गिलचा धक्कादायक खुलासा

“फिल्म इंडस्ट्री सगळ्यांसाठी नाहीच”, शहनाज गिलचा धक्कादायक खुलासा

Subscribe

अलीकडेच शहनाजने अभिनेत्री सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमात दिसली होती. शहनाजने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अनेक पंजाबी सिनेमांमध्ये काम केले आहे.

बॉलिवूडचा दंबग सलमान खानच्या (Salman Khan) रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १३’ (Bigg Boss) मधून नाव आणि प्रसिद्धी मिळवलेली शहनाज गिलला (Shehnaaz Gill) कोणच्याही परिचयाची गरज नाही. पंजाबची कतरिना कैफ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहनाज गिलने आता बॉलिवूडमध्येही पदार्पण केले आहे. अलीकडेच शहनाजने अभिनेत्री सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमात दिसली होती. शहनाजने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अनेक पंजाबी सिनेमांमध्ये काम केले आहे. मात्र, बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी तिला खूप मेहनत करावी लागली आहे. अभिनेत्रीने नुकतेच म्हटले आहे की, फिल्म इंडस्ट्री (Bollywood Industry) ही प्रत्येकासाठी नसते, जाणून घ्या ती असे का म्हणाली.

‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमातून शहनाज गिलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. बिग बॉसमध्ये येऊन घराघरात लोकप्रियता मिळवणारी शहनाज आता बॉलिवूडमध्येही वेगाने पाऊल टाकत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल सांगितले की, ही इंडस्ट्री सर्वांसाठी खुली नाही.

- Advertisement -

शहनाजने खुलासा केला की, बॉलीवूड इंडस्ट्रीमध्येही तिच्यासाठी गोष्टी सोप्या नाहीत आणि ती जे काही साध्य करत आहे ते तिच्या मेहनतीचे फळ आहे. शहनाज पुढे म्हणाली की, मला वाटले की इंडस्ट्रीचे दरवाजे हे सर्वांसाठी उघडत नाही, ती तुम्हालाच उघडावी लागतात. इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी तुम्हाला स्वतःवर काम करावे लागते, तुम्हाला स्वतःला बदलावे लागेल. माझ्यासाठी कोणतीही गोष्ट सोपी नाही, मी जे काही करत आहे, ते मी माझ्या मेहनतीने करत आहे.

- Advertisement -

प्रेक्षकांमध्ये सक्रिय राहण्यासाठी तुम्हाला स्वत:ला नव्याने शोधण्याची गरज आहे, असे शहनाजचे मत आहे. तिच्या चाहत्यांनी तिला कंटाळा आणावा असे तिला वाटत नाही. तुम्ही खऱ्या आयुष्यात जसे आहात तसे स्वत:ला सादर केले आणि प्रेक्षकांना नवीन काही दिले नाही, तर तेच तेच बघून कंटाळा येईल, असे ते म्हणाले. आम्ही पब्लिक फिगर आहोत, त्यामुळे प्रेक्षकांना कंटाळा येऊ नये, यासाठी आम्हाला वेगवेगळ्या रूपात स्वत:ला सादर करावे लागेल.

शहनाज गिलने इंडस्ट्रीत सक्रिय राहण्यासाठी आणि आपले स्थान निर्माण करण्यासाठी स्वतःला बदलण्यावर जास्त भर दिला. याआधीही, तिने एका यूट्यूब लाईव्ह व्हिडिओमध्ये दावा केला होता की मनोरंजन उद्योगात फक्त पातळ मुलींनाच पसंत केले जाते, म्हणून तिने तिचे वजन कमी केले आहे आणि बॉडी ट्रांसफॉर्मेशन केले आहे.

आपल्या व्यस्त शेड्युलमधून ब्रेक घेत शहनाज गिल सध्या फुकेतमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. ही अभिनेत्री तिच्या आईसोबत सुट्टी साजरी करण्यासाठी फुकेतला पोहोचली आहे, तिथून तिने समुद्रकिनाऱ्यावरील तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा हॉटनेस पाहून चाहते वेडे झाले आहेत.

 

- Advertisment -

Manini