घरमनोरंजनAyushmann Khurrana : "संपूर्ण बॉलिवूड रेंटवर..."आयुष्मान खुरानाने केली पोलखोल

Ayushmann Khurrana : “संपूर्ण बॉलिवूड रेंटवर…”आयुष्मान खुरानाने केली पोलखोल

Subscribe

आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक होत असतं. त्याचे चाहते त्याच्या अभिनयासह फॅनश सेन्सचंदेखील कौतुक करत असतात. बॉलिवूडच्या स्टायलिश अभिनेत्यांमध्ये त्याचा समावेश होतो. नुकताच एका मुलाखतीत आयुषमानने बॉलिवूडबाबत मोठा खुलासा केला आहे. संपूर्ण बॉलिवूड रेंटवर असल्याचं वक्तव्य आयुषमानने केलं आहे. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आयुषमानने बॉलिवूड कलाकारांच्या लाइफस्टाइलबाबत भाष्य केलं आहे. खरं तर कलाकार हे सगळेच कपडे विकत घेत नाहीत, असं आयुषमानने सांगितलं.

आयुष्मान खुराना म्हणाला, “संपूर्ण बॉलिवूड रेंटवर आहे. तुम्हाला काय वाटतं आम्ही छान-छान कपडे विकत घेत असतो? तर तसं नाही. आम्ही स्टाइलिस्टला कामावर ठेवतो. त्यांच्याकडून आम्ही रेंटवर कपडे घेतो आणि परत करतो. एवढे कपडे आम्ही कुठून आणणार?”. आयुषमानने पुढे दिलजीत दोसांझची स्टाइल आवडत असल्याचंही सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

- Advertisement -

 “मला फॅशनबद्दल जास्त माहीत नाही. मला साधी लाइफस्टाइल आवडते. पण, कामामुळे मला वेगवेगळे लूक करावे लागते. माझ्या कामाचा तो भाग आहे. माझा भाऊ अपारशक्तीचा फॅशन सेन्स चांगला आहे. तो हे काम खूप चांगल्याप्रकारे करतो. जेव्हा मी सुरुवातीला अँकरिंग करायचो तेव्हा अपारशक्तीच माझी स्टायलिंग करायचा,” त्याबदल्यात मी भावाला पॉकेटमनी द्यायचो. असंही आयुष्मान म्हणाला.

आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल 2’ हा चित्रपट शेवटचा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यात तो अनन्या पांडेसोबत दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. आयुष्मान आता ‘बॉर्डर 2’मध्ये झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Vicky Kaushal : ‘छावा’ चित्रपटातील विकी कौशलचा फर्स्ट लूक व्हायरल

______________________________________________________________________
Edited By : Nikita Shinde

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -