घरक्राइमCrime News : लॉरेन्स बिष्णोई नावाने बोगस कॉल अन् थेट कारच पोहोचली...

Crime News : लॉरेन्स बिष्णोई नावाने बोगस कॉल अन् थेट कारच पोहोचली गॅलक्सी अपार्टमेंटजवळ

Subscribe

सलमान खान याच्या घराजवळ गोळीबार झाल्यानंतर अज्ञात व्यक्तीने लॉरेन्स बिष्णोाईच्या नावाने बोगस कॉल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मुंबई : बोगस कॉलद्वारे दिशाभूल केल्याप्रकरणी रोहित त्यागी या आरोपीस उत्तर प्रदेशातून वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सलमान खान याच्या घराजवळ गोळीबार झाल्यानंतर अज्ञात व्यक्तीने लॉरेन्स बिष्णोाईच्या नावाने हा कॉल केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. (A bogus call by the name of Lawrence Bishnoi and the car directly reached Galaxy Apartment)

गेल्या आठवड्यात बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ काही अज्ञात बाईकस्वारांनी गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर अवघ्या काही तासात गुजरात येथील भूज शहरातून पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली होती. चौकशीत या दोघांनी सलमान खान याच्या घराजवळ गोळीबार केल्याचे तपासात उघडकीस आले होते. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी केली होती. गोळीबाराची ही बातमी सर्व चॅनेलवर दाखविली जात असताना एका खाजगी कॅब कंपनीला अज्ञात व्यक्तीने फोन केला होता.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Crime News : ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील आरोपीला अटक

कॉल करणार्‍या व्यक्तीने स्वत:चे नाव लॉरेन्स बिष्णोई असल्याचे सांगून कॅबचालकाला सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ बोलावले. ठरल्याप्रमाणे कॅबचालक गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ पोहचला. मात्र तिथेही कोणीही आले नाही, म्हणून कॅबचालकाने गॅलेक्सी अपार्टमेंटच्या सुरक्षारक्षकाकडे लॉरेन्सविषयी विचारणा करून त्यांना कॅब बुक केल्याची माहिती सांगितली. मात्र लॉरेन्स बिष्णोाई नावाच्या कुठल्याही व्यक्तीने कॅब बुक केली नसल्याचे उघडकीस आले. यानंतर सुरक्षारक्षकाने ही माहिती वांद्रे पोलिसांना दिली.

- Advertisement -

या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कॅबचालकाची चौकशी केली. त्याच्या चौकशीतून कोणीतरी लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने कॅब बुक करून त्याला गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ पाठविल्याचे उघडकीस आले. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून घेतला, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे यांच्या पथकाने तपास सुरू केला होता. तपासातदम्यान हा कॉल उत्तरप्रदेशातून आल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर वांद्रे पोलिसांच्या एका विशेष पथकाने उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथून रोहित त्यागीला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

हेही वाचा – Mumbai Crime News : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवत 98 लाखांची फसवणूक

रोहित हा कॉलेज विद्यार्थी असून त्याने विविध चॅनेलवर सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ गोळीबार झाल्याची माहिती पाहिली होती. त्यातून टाईम पास म्हणून त्याने संबंधित कॅब कंपनीला कॉल करून लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने एक कॅब बुक केल्याचे उघडकीस आले. या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले आणि वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सागितले आहे.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -