घरमनोरंजनRiteish Deshmukh : अयोध्येत पोहोचले रितेश-जेनेलिया, सहकुटुंब घेतलं दर्शन

Riteish Deshmukh : अयोध्येत पोहोचले रितेश-जेनेलिया, सहकुटुंब घेतलं दर्शन

Subscribe

अभिनेता रितेश आणि जेनेलिया देशमुख हे मनोरंजनसृष्टीतील एक पॉवर कपल, आदर्श जोडपं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते दोघे त्यांचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. म्हणूनच महाराष्ट्रात त्यांना दादा-वहिनी असं संबोधलं जातं. रितेश नुकताच सहकुटुंब अयोध्येत पोहोचला, त्याचे खास फोटोही त्याने चाहत्यांसोबत शेअर केले.

जानेवारी महिन्यात अयोध्येतील राम मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला होता. त्यावेळी रितेश-जेनेलिया हजर राहिले नव्हते. त्यामुळे आता ही जोडी आपल्या दोन्ही मुलांसह रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी लखनऊ येथे सुरू असलेल्या आयपीएल मॅच पाहायला रितेश आपल्या कुटुंबीयांसह लखनऊ येथे आले होते. यानंतर ते अयोध्येला आले. याठिकाणी त्यांनी रामललाच्या दरबारात रामललाची आरती केली. तसेच रामललाचा आशीर्वाद मागितला. रितेश देशमुखने दर्शन घेतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

- Advertisement -

 मंत्रो से बढके तेरा नाम…जय श्री राम! आज रामलल्लाचं दर्शन घेता आलं, आम्ही धन्य झालो #राममंदिरअयोध्या – अशी कॅप्शन रितेशेन या फोटोसोबत लिहीली. त्याच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स, लाइक्सचा वर्षाव केला.

दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, हे दोघेही ‘वेड’ चित्रपटात एकत्र दिसले होते. जेनेलिया लवकरच आमिर खानच्या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. रितेश सध्या ‘हाऊसफुल्ल 5’ च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तसेच रितेश देशमुख ‘रेड 2’ मध्ये सहभागी झाल्याची बातमी देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ट्रोलिंगनंतर चिन्मय मांडलेकरचा निर्णय, छत्रपती शिवरायांच्या भूमिकेची घेतली रजा

______________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -