Saturday, May 18, 2024
घरमानिनीFashionCotton Saree - ग्रेसफुल लूक देणारी कॉटन साडी

Cotton Saree – ग्रेसफुल लूक देणारी कॉटन साडी

Subscribe

जर तुम्ही वर्कींग वुमन असाल आणि तुम्हांला साडी नेसायची आवड असेल तर तुमच्या ऑफिस लूकसाठी काही खास कॉटन साड्या हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

ऑफिस असो की छोटे मोठे इवेंट कॉटनच्या साडीमधला लूक फक्त इतरांचे लक्षच वेधत नाही तर तुमचा पर्सनेलिटीही खुलवतो.

- Advertisement -

यामुळे चारचौघात तुम्ही उठून दिसता. कॉटन उन्हाळ्यात वापरायला सर्वाधिक सोयीचं आहे. यामुळे या दिवसात कॉटनच्या साडीला मोठी मागणी असते.

 

- Advertisement -

कॉटन साड्यांमध्ये अनेक प्रकार असून वर्कींग वुमनची विशेष पसंती प्लेन साड्यांना असते.

या प्लेन कॉटन साडीवर कॉन्ट्रास्ट स्लिवलेस ब्लाऊज वेअर करू शकता. त्यावर हलका मेकअप केला की सिंपलबरोबरच स्टायलिश लूकही मिळतो.

सफेद रंग हा कुठल्याही प्रसंगात वापरता येतो. यामुळे त्याला युनिक रंग म्हणतात. उन्हाळ्यात सफेद रंगाची कॉटन साडी वेगळा लूक देते.

सिंपल सोबर लुक देणाऱ्या सफेद साडीवर कोणत्याही रंगाचा प्रिंटेट ब्लाऊज डोळ्यांना बघायलाही छान वाटतो.

ऑफिससाठी शक्यतो हलक्या रंगाच्या आणि वजनाच्या सुटसुटीत साड्या निवडाव्यात.

कॉटनमध्येही अनेक वेगवेगळ्या स्टाईल आणि रंगाच्या साड्या उपलब्ध असतात.

त्यात चेक्सची साडी एलिगंट लुक देते.

त्यावर प्रिंटेट ब्लाऊज शोभून दिसते.

जयपूर कॉटन या कॉटनच्या साड्या महिलांमध्ये सगळ्यात लोकप्रिय आहे.

ज्यांना सोबर सिंपल लूक आवडत असेल त्यांच्यासाठी कॉटन साडी उत्तम पर्याय आहे.

बारीक प्रिंट आणि अंगाला उब देणारी मलमल साडीने व्यक्तीमत्व तर खुलवतचं पण ज्यांना भडक रंग आवडत नाहीत त्यांच्यासाठी जयपूर कॉटनची साडी हे बेस्ट ऑप्शन असू शकते.

- Advertisment -

Manini