घरदेश-विदेशIndiGo Flight : इंडिगोच्या प्रवाशांवर जमिनीवर बसून जेवण्याची वेळ, व्हिडीओ सोशल मीडियावर...

IndiGo Flight : इंडिगोच्या प्रवाशांवर जमिनीवर बसून जेवण्याची वेळ, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Subscribe

मुंबई :  उत्तर भारतात खराब हवामान असल्यामुळे हवेमध्ये दाट धुक्याचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम विमान सेवेवर झाला आहे. त्यामुळे विमानतळावरून उड्डाण घेणारी अनेक विमाने उशीराने उड्डाण घेत आहेत. गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईला 12 तास उशीर झाला. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी एअरक्राफ्ट पार्किंगमध्ये बसले आणि तिथेच जमिनीवर बसून जेवण केलं. या प्रकरणावर इंडिगोनं प्रवाशांची माफी मागितली.

इंडिगो एअरलाईन्सचे प्रवासी विमानतळावर जमिनीवर बसून जेवण करत आहेत. प्रवासी जेवण करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. अनेक नेटकर्‍यांनी कमेंट केली आहे,तर अनेकांना प्रश्न पडला आहे की, नक्की काय हे प्रकरण आहे?

- Advertisement -

व्हायरल व्हिडीओमध्ये नक्की काय आहे?

गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईटला 12 तास उशीर झाला. काल (ता.15 जानेवारी) गोव्याहून सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी उड्डाण घेणारी इंडिगोची फ्लाईट रात्री 10 वाजून 6 मिनीटांनी निघाली. दिल्लीत दाट धुक्यांमुळे विमान 12 तास उशिरा निघालं. गोव्याहून फ्लाईट मुंबईला उतरवण्यात आलं. त्यामुळे प्रवाशांचा संताप वाढला. त्यामुळे संतापलेले प्रवासी विमानाबहेर येत जमिनीवरच बसून जेवण करताना दिसले. प्रवाशांचा जमिनीवर बसून जेवण करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही जण आपापसात चर्चा करत आहेत. तर काही जण जेवण करत आहेत.

- Advertisement -

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इंडिगोने प्रवाशांना माफी मागितली आहे. या प्रकरणी इंडिगोने म्हटलं आहे की, “आम्हाला 14 जानेवारी रोजी गोवा ते दिल्ली येथे इंडिगो फ्लाइट 6E2195 च्या घटनेची माहिती आहे. दिल्लीत दृश्यमानता कमी असल्याने विमान मुंबईकडे वळवण्यात आलं. आम्ही आमच्या ग्राहकांची मनापासून माफी मागतो आणि सध्या या घटनेची चौकशी करत आहोत.”

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -