घरदेश-विदेशIndiGo : जाना था हनिमून, पहुंच गये जेल... पायलटच्या कानशिलात लगावणाऱ्याची व्यथा

IndiGo : जाना था हनिमून, पहुंच गये जेल… पायलटच्या कानशिलात लगावणाऱ्याची व्यथा

Subscribe

इंडिगोच्या 6E 2175 या फ्लाइट ही दिल्लीहून गोव्यात जाणाऱ्या असताना सोमवारी दुपारी वाजताच्या सुमारास ही घटना घडली. खराब वातावरणामुळे विमान उड्डाणास विलंब होणार असल्याची घोषणा सहपायलटने केली. आधीच विमान 13 तास विलंब झाला होता.

नवी दिल्ली : दिल्ली-गोवा इंडिगो फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने सहपायलटला मारहाण केल्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी इंडिगोने प्रवाशाविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर दिल्ली पोलिसांनी प्रवाशी साहिल कटारियाला अटक देखील केले होते. यानंतर सोमवारी (14 जानेवारी) सायंकाळी साहिल कटारियाला जामीन देखील मंजूर करण्यात आला. सहपायलटला मारहाण करताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी साहिल कटारियाविरोधात आयपीसीच्या कलम 323, 341 आणि कलम 290 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यांची साहिल कटारियाची सुटका करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. साहिल कटारियाचे नुकतेच लग्न झाले आहे. साहिल कटारिया पत्नीसोबत हनिमूनसाठी गोव्याला निघाला होता. पण इंडिगोची फ्लाइट ही खराब हवामानामुळे उड्डाणाला विलंब होणार असल्याची घोषणा सहपायलटने गेली. यावेळी साहिल कटारिया संतापल्यानंतर सहपायलटच्या कानशिलात लगावली. कारण आधीच फ्लाइट ही उड्डाणाला 13 तास विलंब झाला होता.

- Advertisement -

हेही वाचा – IndiGo Flight : प्रवाशाने पायलटच्या कानशिलात लगावली! नंतर माफीचा व्हिडीओ व्हायरल, काय घडले असे?

साहिल कटारिया हनिमूनसाठी निघाला

पत्नीसोबत साहिल कटारिया हा हनिमूनसाठी गोव्याला जात होता. साहिला हा दक्षिण दिल्ली येथील अमर कॉलनीमध्ये एक खेळण्याचा दुकान आणि स्टेशनरीचे दुकान आहे. पोलिसांनी साहिल कटारियाला ताब्यात घेतले होते. यात साहिलचा आणखी एक व्हिडिओसमोर आला. यात नवीन व्हिडिओमध्ये ‘सॉरी सर’ म्हणताना दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Athawale On Ambedkar : ‘आम्ही आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार, पण…; आठवलेंची भूमिका

नेमके काय झाले?

इंडिगोच्या 6E 2175 या फ्लाइट ही दिल्लीहून गोव्यात जाणाऱ्या असताना सोमवारी (14 जानेवारी) दुपारी वाजताच्या सुमारास ही घटना घडली. खराब वातावरणामुळे विमान उड्डाणास विलंब होणार असल्याची घोषणा सहपायलटने केली. आधीच विमान 13 तास विलंब झाला होता. यात आणखी विलंब होण्याच्या बातमीने साहिल कटारिया संतापला होता. यानंतर साहिल कटारियाने सहपायलटच्या कानशिलात लगावली होती. त्याला वाचवण्यासाठी पायलट धावून आला. हा संपूर्ण प्रकारणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर इंडिगोने साहिल विरोधात दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -