घरमुंबईIndigo Flight : मुंबईहून लखनऊला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवासी म्हणाला, 'माझ्या सीटखाली...

Indigo Flight : मुंबईहून लखनऊला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवासी म्हणाला, ‘माझ्या सीटखाली बॉम्ब…’

Subscribe

मुंबई : मुंबईहून लखनौला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात त्यावेळी गोंधळ उडाला होता. जेव्हा एका प्रवाशाने त्याच्या सीटखाली बॉम्ब असल्याची माहिती दिली. ही बातमी मिळताच विमान उड्डाण थांबवण्यात आले. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डिंगच्या वेळेत त्या व्यक्तीने लखनौला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटमध्ये सीटखाली बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. ही घटना 26 जानेवारीला घडल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो फ्लाइट क्रमांक 6E 5264 मध्ये मुंबईहून लखनौला जात असलेल्या एका प्रवाशाने सांगितले की, त्याच्या सीटखाली बॉम्ब आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि विमानतळ यंत्रणांनी घटनास्थळ गाठून विमानाची कसून चौकशी केली.

- Advertisement -

तपासादरम्यान विमानातून कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नसल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. यानंतर मुंबई पोलिसांनी 27 वर्षीय प्रवाशाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 506(2) आणि 505(1)(बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रवाशाने असे का केले याचा तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -