घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी जाहीर, 12व्या यादीतून भाजपाची घोषणा

Lok Sabha 2024 : साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी जाहीर, 12व्या यादीतून भाजपाची घोषणा

Subscribe

भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभेतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाने आज मंगळवारी (ता. 16 एप्रिल) लोकसभा उमेदवारांची 12वी यादी यादी जाहीर केली आहे.

सातारा : भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभेतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाने आज मंगळवारी (ता. 16 एप्रिल) लोकसभा उमेदवारांची 12वी यादी जाहीर केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातून सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता साताऱ्यात भाजपाचे उदयनराजे भोसले वि. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे अशी लढत पाहायला मिळणार आहे. (Lok Sabha Election 2024 BJP has announced candidacy of Udayanraje Bhosale from Satara Constituency)

सातारा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करत भाजपाचे नेते उदयनराजे यांनी थेट दिल्ली गाठली होती. दिल्लीत त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर त्यांची उमेदवारी निश्चित झाली होती. पण काही दिवस उलटून देखील त्यांची उमेदवारी भाजपाकडून जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे भाजपा उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण आज अखेरीस हा प्रश्न मार्गी लागला असून उदयनराजे हे महायुतीचे अधिकृत उमेवार असणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा… Sangli Lok Sabha : अपक्ष अर्ज भरल्यानंतर विशाल पाटलांचं शक्तीप्रदर्शन; सांगली काँग्रेसचा वाद चिघळला

महायुतीमध्ये सातारा लोकसभेवरून तिढा निर्माण झाला होता. कारण अद्यापही महायुतीकडून जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आलेला नाही. त्यामुळे साताऱ्याची जागा महायुतीत कोणाला सुटणार? असा प्रश्न कायम होता. कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून साताऱ्याच्या जागेवर दावा करण्यात आला होता. त्यामुळे चिंतेत सापडलेल्या उदयनराजेंनी तत्काळ दिल्ली गाठत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. यावेळी त्यांना पक्षश्रेष्ठींनी लगेच भेटीची वेळ न दिल्याने ते तीन दिवस दिल्लीत मुक्कामाला होते. पण अखेरीस दिल्लीवरून साताऱ्याची जागा त्यांनाच मिळणार, हा शब्द घेऊन महाराष्ट्रात आले.

- Advertisement -

दिल्लीवरून आल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात मोठे शक्तीप्रदर्शन केले. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी साताऱ्याच्या रस्त्यांवर आले होते. त्यामुळे उदयनराजेंच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा कधी होणार? याची त्यांच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता होती. पण आज सकाळीच भाजपाने आपल्या उमेदवारांची 12वी यादी जाहीर करत त्यामध्ये उदयनराजेंच्या उमेदवारीचीही घोषणा केली आहे. त्यामुळे आता सातारा लोकसभेत महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आणि महायुतीकडून भाजपाचे उदयनराजे भोसले असा सामना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : अवघड ते सोप करण्याची आमच्यात ताकद; असं का म्हणाले नारायण राणे?


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -