Monday, April 29, 2024
घरमानिनीBeautyBeauty : नाचणीचा फेस पॅक...

Beauty : नाचणीचा फेस पॅक…

Subscribe

तुमच्या त्वचेची हरवलेली चमक मिळवण्यासाठी तुम्ही नैसर्गिक पर्याय जर शोधत असाल तर नाचणीपासून तयार केलेला फेस पॅक तुमची समस्या सोडवू शकतो. यासोबतच त्वचेची हरवलेली चमक परत मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या उत्पादनांचा वापर केला जातो. मग त्वचेची काळजी असो वा मेकअप. वास्तविक, रसायनांचा जास्त प्रमाणात वापर केल्याने त्वचेची नैसर्गिक चमक निघून जाते आणि त्वचा निर्जीव आणि खडबडीत होऊ लागते. तसेच थंडीच्या काळात त्वचेचा कोरडेपणा आणखी वाढतो. चला तर मग नाचणीचा फेस पॅक तयार करण्याच्या स्टेप्स आणि त्याचे फायदे जाणून घेऊया.

नाचणीचा फेस पॅक बनवण्यासाठी या गोष्टी वापरा

  • नाचणी पावडर 1 टीस्पून
  • दही 12 टीस्पून
  • मध 1/2 टीस्पून
  • लिंबाचा रस 1 टीस्पून

ஹீரோயின் போன்ற முகப்பொலிவு வேண்டுமா? உங்களுக்காகவே கேழ்வரகு ஃபேஸ்பேக் – News18 தமிழ்

नाचणीचा फेस पॅक असा तयार करा..

  • सर्वप्रथम नाचणी बारीक करून त्याची पावडर करा आणि या पावडरमध्ये दही मिक्स करा.
  • आता मिश्रण काही वेळ ढवळल्यानंतर त्यात मध आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा.
  • हा पॅक तयार झाल्यावर आणि त्याला सेट होण्यासाठी या पॅकला10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्या.
  • तसेच तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यात गुलापाणी देखील वापरू शकता.

नाचणीच्या फेस पॅकचे फायदे जाणून घ्या

  • नाचणीचा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर चमक येते.
  • तसेच चेहऱ्याच्या मृत पेशी सहज काढता येतात.
  • यामुळे त्वचेचे छिद्र स्वच्छ होऊ लागतात आणि ब्लॅक हेड्सची समस्या देखील दूर होते.
  • फायबर युक्त नाचणी चेहऱ्यावर लावल्याने वेळेपूर्वी सुरकुत्या येण्याची समस्या टाळता येते.
  • यामध्ये असलेले फिनोलिक अॅसिड त्वचेच्या पेशींची दुरुस्ती करून त्यांना मजबूत करते.
  • नाचणीमध्ये आढळणारे अमीनो अॅसिड आणि फ्लेव्होनॉइड्स कोरडी त्वचा मॉइश्चराइज ठेवतात .
  • हे चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची चमक वाढते आणि त्वचा मॉइश्चराइज राहते. आठवड्यातून दोनदा वापरण्याची खात्री करा.
  • नाचणी खाण्याबरोबरच तिचा फेसपॅक त्वचेवर लावण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये मेथिओनिन आणि लायसिन नावाचे घटक आढळतात.
  • तसेच नाचणी चेहऱ्यावर फेसपॅक म्हणून लावल्याने कोरड्या त्वचेची समस्या दूर होते आणि खाज सुटण्यापासून आराम मिळतो. तसेच हा फेसपॅक्सक लावल्याने त्वचा मॉइश्चराइज राहते.

हेही वाचा : सौंदर्य खुलवण्यासाठी असा करा तूपाचा वाप

- Advertisment -

Manini