घरताज्या घडामोडीFire In Ray Road : रे रोड येथील एका गोदामाला भीषण आग

Fire In Ray Road : रे रोड येथील एका गोदामाला भीषण आग

Subscribe

दक्षिण मुंबईतील रे रोड परिसरातील दारुखाना येथे असलेल्या गोदामाला भीषण आग लागली. गुरूवारी सकाळी 10:15 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मुंबई : दक्षिण मुंबईतील रे रोड परिसरातील दारुखाना येथे असलेल्या गोदामाला भीषण आग लागली. गुरूवारी सकाळी 10:15 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या अग्नीशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम शर्तीच्या प्रयत्नांवर सुरू आहे. (Fire In Ray Road A fire broke out at a godown in south mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, रे रोड परिसरातील दारुखाना, ब्रिटनिया कंपनी शेजारी असलेल्या देवीदयाळ कंपाऊंड येथे तळमजला आणि एकमजली गोदाम होते. या गोदामाला गुरुवारी सकाळी 10:15 वाजताच्या सुमारास आग लागली. सुरुवातीला ही आग छोटी होती. पण काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. संपूर्ण दारुखाना परिसरात धुराचे लोट पसरले होते. त्यानंतर या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Metro : मुंबई महापालिकेकडून मेट्रोच्या कंत्राटदारांना नोटीस, काय आहे प्रकरण?

या आगीच्या घटनेबाबत वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. मात्र आगीची भीषणता पाहता अग्निशमन दलाने सकाळी ११.०४ वाजताच्या सुमारास सदर आग स्तर -३ ची असल्याचे जाहीर करीत अग्निशमन करण्यासाठी आणखीन जास्तीची यंत्रणा मागवली. अग्निशमन दलासोबत स्थानिक पोलीस, महापालिका वार्ड स्तरावरील यंत्रणा, बेस्ट उपक्रम आदी यंत्रणा आणि रुग्णवाहिका यांची व्यवस्था करण्यात आली होती.

- Advertisement -

आग भीषण स्वरूपाची असल्याने अग्निशमन दलाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी 10 फायर इंजिन , 8 जंबो वॉटर टँकर यांच्या साहाय्याने तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवून आग विझविली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र या गोदामाला नेमकी आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलासोबत स्थानिक पोलीस या आगीचा तपास करत आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मोठ्याप्रमाणात गोदामाचे नुकसान झाले आहे.


हेही वाचा – Weather Update Today : काळजी घ्या! मुंबई, ठाण्यासह कोकणाला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -