घरमहाराष्ट्रपुणेFarmer Suicide : बारामतीत शेतकऱ्याची आत्महत्या, व्हिडीओतून धक्कादायक कारण आले समोर

Farmer Suicide : बारामतीत शेतकऱ्याची आत्महत्या, व्हिडीओतून धक्कादायक कारण आले समोर

Subscribe

पुण्यातील बारामतीमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हनुमंत सणस असे या शेतकऱ्याचे नाव असून या शेतकऱ्याने नापिकी किंवा कर्जबाजारीपणाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतला नसून वेगळ्याच कारणामुळे शेतकऱ्याने आपले जीवन संपवले आहे.

पुणे : गेल्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात तब्बल 427 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. शेतकरी आत्महत्यांसंदर्भातील ही धक्कादायक आकडेवारी काही तासांपूर्वीच समोर आली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता पुण्यातील बारामतीमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हनुमंत सणस असे या शेतकऱ्याचे नाव असून या शेतकऱ्याने नापिकी किंवा कर्जबाजारीपणाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतला नसून वेगळ्याच कारणामुळे शेतकऱ्याने आपले जीवन संपवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हनुमंत सणस यांनी व्हिडीओतून आत्महत्या करण्याचे कारण सांगितले आहे. (Farmer Suicide in Baramati harrassed by Police and irrigation department)

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत सणस हे बारामतीमधील लाटे तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामधून त्यांनी त्यांच्या आत्महत्येते कारण सांगितले आहे. या व्हिडीओमधून सणस यांनी त्यांना पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग आणि स्थानिक पोलिसांनी त्यांना कसा त्रास दिला याची आपबिती सांगितली. या तिन्ही विभागातील अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून या शेकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर आता या प्रकरणी अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत.

- Advertisement -

हेही वाचा… Farmers Suicide : राज्यात शेतकरी आत्महत्या थांबेना, दोन महिन्यातील धक्कादायक आकडेवारी समोर

हनुमंत सणस यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले की, मी हनुमंत 26 फेब्रुवारीला 2024 ला आतम्हत्येचा इशारा दिला. मला इतका त्रास दिला आहे मी खूर त्रास दिला त्याला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझे वय 70 वर्षे आहेत. माझ्या वावरात अतिक्रमण करुन मला दम देतात. माझ्या खिशात या संदर्भात चिठ्ठी लिहली आहे, वारंवार तक्रार देखील करुन पोलीसांनी उलट मला, माझ्या भावाला आणि मुलाला दम दिला. जिथे अतिक्रमण केले त्याच जागेत मी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या चिठ्ठीत ज्यांची नावे आहेत ते माझ्या आत्महत्येला जबाबदार असून त्यांना तात्काळ अटक करावी, असे या शेतकऱ्याने सांगितले आहे.

- Advertisement -

या प्रकरणी हुनमंत सणस यांचे बंधू जयवंत सणस यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, स्थानिक पोलीसांनी देखील आम्हाला त्रास दिला. बारामती तालुक्यातील लाटेमध्ये सणस यांची जागा आहे. सणस यांच्या रानामध्ये येथील परिसरातील शेतकऱ्यांनी विनापरवाना विद्युतधारक विद्युत पंप बसवलेले असताना त्या शेतकऱ्यांना सणस यांनी हे पंप काढायला सांगितले. सणस यांचे रान मोकळे केले, त्यानंतर हनुमंत सणस आणि त्यांचा भाऊ त्या रानामध्ये जेसीबी घेऊन साफसफाई करण्यासाठी गेले असताना सणस यांना दमदाटी केली आणि खोट्या केसेस करू, अशी धमकी देखील काही लोकांनी दिली. त्यानंतर वारंवार पोलीस स्टेशनमधून हनुमंत सणस आणि त्यांचे बंधू यांना फोन येऊ लागले. या भितीला घाबरून हनुमंत सणस यांनी आत्महत्या केली आहे, असा दावा जयवंत सणस यांच्याकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा… Water Crisis In Marathwada : मराठवाड्यात पाणीबाणी; गतवर्षीच्या तुलनेत यंदा साठ्यात मोठी घट


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -