घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : तामिळनाडूत राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून झडती; वाचा...

Lok Sabha 2024 : तामिळनाडूत राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून झडती; वाचा नेमकं प्रकरण काय?

Subscribe

Lok Sabha Election 2024 लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. यंदा देशात एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीकरीता भाजप आणि काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

तामिळनाडू : लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. यंदा देशात एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीकरीता भाजप आणि काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेस आणि भाजपने एकमेकांच्या आश्वासनांवर निशाणा साधत आपल्या योजना सांगत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकिकडे राजकीय पक्ष प्रचाराला लागले असता, दुसरीकडे निवडणूक आयोगही अॅक्शन मोडवर आल्याचे पहायला मिळत आहे. (Lok Sabha Election 2024 congress leader rahul gandhi helicopter checked by election commission flying squad in tamil nadu)

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरीता केरळच्या वायनाड मतदारसंघात रवाना होणार होते. त्यावेळी राहुल गांधी तामिळनाडूतील निलगिरीला पोहोचले असता निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची झडती घेतल्याची माहिती समोर येत आहे. निवडणूक आयोगाच्या फ्लाइंग स्क्वॉड अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरची तपासणी सुरू केली.

- Advertisement -

हेही वाचा – Politics : राजकारणात 10 क्रिकेटर्सची एन्ट्री; काही संसदेपर्यंत पोहचले तर काहींची सुरुवातच खराब झाली

निवडणूक आयोगाच्या फ्लाइंग स्क्वॉड अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरची तपासणी केली असता, त्यांना हेलिकॉप्टरमधून काहीच मिळालं नाही. राहुल गांधी आज (15 एप्रिल) निवडणूक प्रचारासाठी केरळच्या वायनाड मतदारसंघात रवाना होणार होते.

- Advertisement -

दरम्यान, या निवडणुकीत आयोगाने आपल्या 75 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक रोख रक्कम जप्त केली असून तपासात एकाही मोठ्या नेत्याला सोडले नाही. याशिवाय, बेंगळुरू दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जयनगर येथे शनिवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी तीन कारमधून 1.34 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली. या घटनेमुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले.

93 लाख 30 हजारांचे सोने जप्त

लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत 93 हजार 50 हजार 97 रुपयांचे किमतीचे सोने व रोख रक्कम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. निवडणुक काळात कोणत्याही व्यक्तीला 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम जवळ बाळगता येत नाही. मात्र, संबंधितीत व्यक्तीकडून 1 किलो 311.28 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, तसेच 34 हजार 700 रुपये रोक रक्कम, तर दुसर्या व्यक्तीकडून 1 लाख 36 हजार 500 रुपये किमतीचे 19.70 ग्रॅम वजनाचे दागिने असे एकूण 93 लाख 50 हजार 97 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.


हेही वाचा – LOK SABHA ELECTION 2024 : राणे की सामंत, रत्नागिरी-सिंधुदुर्गात महायुतीकडून कोणाची लागणार लॉटरी?

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -