घरदेश-विदेशDY Chandrachud : एक सेकंद, तुमचा आवाज कमी करा; सरन्यायाधीश वकिलावर भडकले...

DY Chandrachud : एक सेकंद, तुमचा आवाज कमी करा; सरन्यायाधीश वकिलावर भडकले अन्…

Subscribe

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश (CJI) डीवाय चंद्रचूड (DY Chandrachud) यांचा स्वभाव हसरा आहे, पण ते भरपूर रागही येतो, हे आज सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीदरम्यान पाहायला मिळाले. एका वकिलाचा संभाषणाचा स्वर त्यांना अत्यंत तिरस्कार देणारा वाटला. याचिकेच्या यादीवरून झालेल्या वादादरम्यान चंद्रचूड यांनी वकिलाला चांगलेच फटकाले. त्यांनी वकिलाला ताकीद देतान म्हटले की, आवाज कमी करा, न्यायालयाला धमकावण्याचा प्रयत्न करू नका. चंद्रचूड वकिलावर भडकल्याचे पाहिल्यानंतर संपूर्ण न्यायालयात अचानक शांतता पसरली. (DY Chandrachud One second lower your voice The Chief Justice became angry with the lawyer and the court fell silent)

हेही वाचा – Maratha Reservation : मुंबईत आरपारचं आंदोलन, Manoj Jarange मुक्कामाचे टप्पे 10 तारखेला सांगणार

- Advertisement -

याचिकेच्या यादीवरून वाद सुरू असताना चंद्रचूड यांना वकिलाच्या संभाषणाचा वरच्या पट्टीतले वाटले. एक वेळी अशी आली की, चंद्रचूड यांना वकिलाचे संभाषण सहन झाले नाही. अशावेळी त्यांनी वकिलाला थांबवले आणि मर्यादेत बोलण्याचा सल्ला दिला. आपली नाराजी व्यक्त करताना चंद्रचूड म्हणाले की, ‘एक सेकंद, आवाज कमी करा. तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायालयासमोर युक्तिवाद करत आहात. तुमचा आवाज कमी कर नाहीतर तुम्हाला बाहेर काढले जाईल.

23 वर्षांत असे कधीही घडलेले नाही

वकिलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना चंद्रचूड म्हणाले की, तुम्ही प्रत्येक वेळी असेच न्यायाधीशांवर ओरडता का? त्यामुळे तुमचा आवाज आधी कमी करा. तुम्ही तुमचा आवाज वाढवून आम्हाला घाबरवू शकता, असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. 23 वर्षांत असे कधीही घडलेले नाही आणि माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षातही हे घडणार नाही. चंद्रचूड यांनी फटकारल्यानंतर वकील घाबरला आणि त्याने लगेच माफी मागितली.

- Advertisement -

हेही वाचा – …तर मुंबईत जाणारं धान्य, दूध बंद करू; Manoj Jarange Patil यांचा राज्य सरकारला इशारा

यापूर्वीही चंद्रचूड यांनी वकिलांना फटकारले

चंद्रचूड यांनी वकिलाला फटकारल्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी आपल्या कोर्टरूममध्ये एका वकिलाच्या फोनवर बोलण्यावर तीव्र आक्षेप घेतला होता. हा बाजार आहे का? तुम्ही फोनवर का बोलत आहात? असे प्रश्न उपस्थित करत वकिलाचा मोबाईल जप्त करण्याचे आदेश दिले होते. तसेच गेल्या वर्षी मार्चमध्ये विकास सिंह नावाच्या ज्येष्ठ वकिलांनी चंद्रचूड यांच्यावर ओरडलेहोते. ते सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना जमिनीशी संबंधित खटल्याचा पाठपुरावा करण्याचे आवाहन करत होते. तेव्हा चंद्रचूड रागाने म्हणाले होते की,, ‘शांत राहा आणि न्यायालयातून बाहेर जा, तुम्ही आम्हाला घाबरवू शकत नाही.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -