घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरUday Samant : बारामती ते मंत्रालय नाटकात धनंजय मुंडेंचा, तर माझा...; उदय...

Uday Samant : बारामती ते मंत्रालय नाटकात धनंजय मुंडेंचा, तर माझा…; उदय सामंतांची तुफान फटकेबाजी

Subscribe

यावेळी बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, मी मैत्री जपणारा कार्यकर्ता आहे. हा गुण मी धनंजय मुंडेंकडून घेतला. राजकारणाच्या पलिकडे जाऊन एखाद्याला ताकद कशी दिली पाहिजे ते मी मुंडेंकडून शिकलो असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी धनंजय मुंडेंचं कौतुक केलं.

बीड : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्घाटन आज (4 फेब्रुवारी) धनंजय मुंडेंच्या हस्ते पार पडलं. यावेळी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी उदय सामंत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या मनोगतातून राजकीय स्थितीवर भाष्य करत तुफान फटकेबाजी केली. (Uday Samant Dhananjay Mundes in the drama Baramati To Mantralaya while Mazza Udaya Samants storming)

यावेळी बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, मी मैत्री जपणारा कार्यकर्ता आहे. हा गुण मी धनंजय मुंडेंकडून घेतला. राजकारणाच्या पलिकडे जाऊन एखाद्याला ताकद कशी दिली पाहिजे ते मी मुंडेंकडून शिकलो असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी धनंजय मुंडेंचं कौतुक केलं.

- Advertisement -

हेही वाचा : Uddhav Thackeray : “…तर मग सामान्य जनतेचे काय होणार?” गोळीबार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

तर मुंबई, गुवाहाटी व्हाया सूरत नाटकात मी…

राज्यातील राजकारणावर भाष्य करताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, मतभेद असूनही कलाकार सगळं काही विसरुन नाटकात काम करण्यासाठी पुढे येतात. त्यांचा आदर्श राजकारणी लोकांनी घ्यायला हवं, असं सामंत म्हणाले. बारामती ते मंत्रालय नाटकात धनंजय मुंडेंचा सहभाग होता. तर मुंबई, गुवाहाटी व्हाया सूरत नाटकात मी होतो. मी पुन्हा येईन नाटकदेखील आधी रचलं गेलं होतं असं म्हणताच उपस्थितांमध्ये हश्या पिकला.

- Advertisement -

हेही वाचा : Ganpat Gaikwad : उल्हासनगर गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; गणपत गायकवाडांवर Atrocity दाखल

आम्ही पडद्यामागं नाटकं करतो

शंभराव्या नाट्य संमेलनाच्या उदघाटनानंतर उपस्थितांना संबोधित करताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाट्य कलावंत प्रशांत दामले यांचं तोंडभरुन कौतुक केलं. ते म्हणाले की, मागील पंचवीस वर्षांपासून प्रशांत दामले यांना पाहतोय. त्यांच्या चेहऱ्यात जराही फरक पडलेला नाही. त्यांच्या नावातच शांत शब्द आहे. प्रयोग करताना जे कधीच नाही दमले, असे म्हणताच उपस्थितांमध्ये हश्या पिकला. तर तुम्ही (प्रशांत दामले) पडद्यावर नाटक करता. आम्ही पडद्यामागे करतो असे म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील राजकीय घडामोडीवर भाष्य केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -