घररायगडदोन्ही मुलींसह आईने एक्स्प्रेसखाली झोकून दिले

दोन्ही मुलींसह आईने एक्स्प्रेसखाली झोकून दिले

Subscribe

माणगाव-: दोन मुलींसह आईने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील लोणेरे येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव-माणगाव येथे राहणार्‍या रिना जयमोहन नायर (३६) आणि जिया (१४), लक्ष्मी जय (१२) या तिघींनी मडगावहून मुंबईकडे धावणार्‍या कोकणकन्या एक्स्प्रेसखाली स्वतःला झोकून देत आपल्या जीवनाचा शेवट केला. एक्स्प्रेसच्या चालकाने या घटनेची माहिती गोरेगाव स्टेशन मास्तरांना दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या तिघींपैकी रिना आणि लक्ष्मी जय यांचे मृतदेह रूळावर पडलेले आढळून आले, तर आधी न सापडलेल्या जिया हिचा मृतदेह दुपारी १२.३० वाजता रूळापासून काही अंतरावर झुडपात आढळून आला.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच एपीआय राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक रासकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, कौटुंबिक कलहामुळे या महिलेने दोन मुलींसह आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रिना हिचा पती केरळमध्ये असल्याने तो आल्यानंतरच खरे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -