Wednesday, April 10, 2024
घरमानिनीHealthHealth Care Tips : उन्हाळ्यात रोज दही खाता ?

Health Care Tips : उन्हाळ्यात रोज दही खाता ?

Subscribe

उन्हाळ्यात दही खाताना या गोष्टीचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच उन्हाळ्यात पोट निरोगी आणि थंड ठेवण्यासाठी दही खाण्याचा सल्ला दिला जातो. दही खाणे आरोग्यासाठी (Eating yogurt for health) चांगले असते. दही हा प्रोबायोटिक्सचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते. दही मध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्वे, बी, पोटॅशियम, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. सुमारे 100 ग्रॅम दह्यामध्ये 3.5 ग्रॅम प्रथिने असतात. याशिवाय त्यात अनेक पौष्टिक घटक असतात, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात उच्च दर्जाचे प्रोबायोटिक्स किंवा चांगले बॅक्टेरिया असतात. पण काही जणांना थोडे दही खाल्ल्यानंतर शरीरात खूप उष्णता जाणवते. अशावेळी दहीचे रोज सेवन करणे चांगले की वाईट याबद्दल जाणून घ्या.

दही कसे खावे?
दही खाताना दही असे कधी डायरेक्ट खाऊ नये. उन्हाळ्यात रोज दही खाण्याऐवजी ताक खावे. काळे मीठ, काळी मिरी आणि जिरे टाकून तुम्ही ते पिऊ शकता. दह्यामध्ये पाणी मिसळले की ते दह्याच्या गरम स्वभावाचे संतुलन राखते. दह्यामध्ये पाणी घातल्याने त्याची उष्णता कमी होते आणि कूलिंग इफेक्ट मिळतो. यासोबतच दही गरम केल्यानंतर खाऊ नका हेही महत्त्वाचे आहे. असे केल्याने दह्यातील सर्व पोषक तत्वे नष्ट होतात. तसेच, जर तुम्ही लठ्ठपणा किंवा कफ दोषाने त्रस्त असाल तर दही खाणे टाळा. आयुर्वेदानुसार दही फळांमध्ये मिसळूनही खाऊ नये. असे केल्याने तुम्हाला पचनाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते.

- Advertisement -

रोज दही खाण्याचे तोटे
असे म्हटले जाते की जर तुमची पचनक्रिया कमजोर असेल तर तुम्ही रोज दही सेवन करू नये. जर पचनसंस्था नीट काम करत नसेल तर दही खाल्ल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.पण लक्षात घ्या की रोज एक कप पेक्षा जास्त दही खाल्ल्यावर या समस्येचा सामना करावा लागतो. जर तुम्ही फक्त एक कप दही खाल्ले तर ते तुमचे नुकसान करत नाही.

- Advertisment -

Manini