घरलाईफस्टाईलSummer Health Tips: उन्हाळ्यात 'या' 4 आजारांचा असतो सर्वाधिक धोका

Summer Health Tips: उन्हाळ्यात ‘या’ 4 आजारांचा असतो सर्वाधिक धोका

Subscribe

उन्हाळा हा ऋतू अनेकांना खूप आवडतो. या ऋतूमध्ये ठंड पेय, विविध उन्हाळी फळांचा आस्वाद घेण्यास मिळतो. एसी आणि कूलरची थंड हवा एकदम ताजेतवानी वाटते. परंतु मज्जा मस्ती आनंद घेऊन येणारा हा ऋतू अनेक आजार देखील आपल्यासबोत आणत असतो. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याकडे दुर्लक्ष करणं जीवघेण ठरू शकते.

१) उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला हीट स्ट्रोक म्हणजे उष्मघाताची त्रास होऊ शकतो. दिवसभर उन्हात जास्त चालण्याने उष्माघात होऊ शकतो. यामध्ये तुम्हाला अकशक्तपणा, डोकेदुखी, ताप, पचनक्रिया बिघडणे यांसारख्या समस्या जाणवू लागतात.

- Advertisement -

२) उन्हाळ्यात तहान लागत नाही असा विचार करून बरेच लोक पाणी पीत नाहीत. पण अशी अजिबात करू नका, कारण शरीरातील डिहायड्रेशनच्या कमतरतेमुळे तुम्हाला कोणताही आजार होऊ शकतो. जर परिस्थिती बिघडली तर ग्लुकोजची बाटली देखील द्यावी लागेल. त्यामुळे तहान लागली नसली तरी पाणी प्यायला विसरू नका. तसेच दिवसातून एकदा तरी ग्लुकोजचे पाणी प्यावे.

३) अन्नातून विषबाधा होण्याची समस्या उन्हाळ्यात सर्वात जास्त आणि लवकर उद्भवते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंतचे जेवण सकाळी कधीही खाऊ नका. दरम्यान अस्वस्थ वाटल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

- Advertisement -

४) उन्हाळ्यात सनबर्नच्या समस्येमुळे त्वचा जळजळणे, लाल चट्टे उटणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे तुम्ही अंगावर आणि चेहऱ्यावर सनस्क्रीन क्रीम लावून किंवा हात आणि तोंड झाकून बाहेर पडा. त्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण जाणवणार नाही.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -