घरनवी मुंबईAPMC Market : आंबा खवय्यांसाठी आनंदाची बातमी, एपीएमसी मार्केटमध्ये आवक सुरू

APMC Market : आंबा खवय्यांसाठी आनंदाची बातमी, एपीएमसी मार्केटमध्ये आवक सुरू

Subscribe

नवी मुंबई : फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होताच एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये आंब्याची आवक सुरू झाली आहे. तसेच या वर्षी भारतीय आणि परदेशी आंबा खवय्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मागच्या वर्षीच्या तुलनेनं यावर्षी एपीएमसी मार्केटमध्ये आंब्याची आवक ही रेकॉर्ड ब्रेक झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एपीएमसी फळ मार्केट फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये 1400 ते 1500 पेट्यांची आवक झाली आहे. यावर्षी चार महिने आंबा उपलब्ध राहणार असून यावर्षी आवक अशीच आवक वाढत राहिली तर नक्कीच 15 फेब्रुवारीपासून निर्यात देखील सुरू होण्याची शक्यता व्यापारी संजय पानसरे यांनी वर्तवली आहे. (APMC Market Good news for mango gourmands arrivals start at APMC Market)

हेही वाचा – Maharashtra Politics : ठाकरे दाम्पत्याचा वंदे भारतने प्रवास आणि…

- Advertisement -

सध्या बाजारात आंब्याची होणारी आवक ही अलिबाग, देवगड, रत्नागिरी, राजापूर, श्रीवर्धन,केरळ तामिळनाडूसह आजूबाजूच्या परिसरातून आंब्याची आवक होत आहे. आंबे हे चांगल्या कॉलिटीचे येत आहेत. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे असे 4 महिने आंबा खवय्यांना आंब्याची चव चाखायला मिळणार आहे. मात्र दर हे आंब्याच्या कॉलिटीनुसार असणार आहेत. यंदा आंब्याचे दर 3 हजारांपासून सुरुवात होत आहे, तर 7 ते 8 हजार रुपयांपर्यंत आहेत.

हेही वाचा – BJP Vs Congress : ईव्हीएममध्ये काहीतरी रहस्य दडलंय; मोदींच्या ‘त्या’ दाव्यावर काँग्रेसचा मिश्किल टोला

- Advertisement -

व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले की, कॉलिटीनुसार आंब्याचे दर ठरवले जातात. येणाऱ्या काळात दर असेच राहतील आणि खवय्यांची देखील चांगली पसंती राहिली. कारण आंबा खवय्ये हे आंबा खरेदी करताना दर नाही तर आंब्याची कॉलिटी पाहून खरेदी करतात. गेल्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी पहिल्यादा फेब्रुवारी महिन्यात आंब्याची प्रचंड आवक झाली आहे. अवकाळी पावसाचा फटका आंब्याच्या मालाला बसला आहे. त्यामुळे व्यापारी संजय पानसरे यांनी बागायतदारांना विनंती केली आहे की, आंबा परिपकव झाल्याशिवाय तोडू नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -