घरक्राइमCrime News: क्रिकेट खेळण्यावरून चाकू हल्ला; तुफान हाणामारीत एकाचा मृत्यू तर सहा...

Crime News: क्रिकेट खेळण्यावरून चाकू हल्ला; तुफान हाणामारीत एकाचा मृत्यू तर सहा जखमी

Subscribe

भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील केजीएन चौक या ठिकाणी पूर्ववैमनस्यातून दोन गटांत तुफान हाणामारी

ठाणे: भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील केजीएन चौक या ठिकाणी पूर्ववैमनस्यातून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या हाणामारीच्या रागातून चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. त्यामुळे आता परिसरात तणाव निर्माण झाला. (Crime News Thane Bhiwandi Knife attack over playing cricket One killed and six injured in the clash)

समोर आलेल्या माहितीनुसार, क्रिकेट खेळण्याच्या वादातून नोव्हेंबरमध्ये दोन गटांत हाणामारी होऊन गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्याचा राग मनात ठेवून एका गटाने धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात सहाजण जखमी झाले असून, त्यात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

नेमकं घडलं काय?

क्रिकेटच्या वादातून या दोन गटांत नोव्हेंबर महिन्यात हाणामारी झाली होती. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर त्याचा राग मनात ठेवून एका गटाने धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात सात जण जखमी झाले. त्यापैकी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण शांतीनगर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

दोन गटांत झालेल्या या हाणामारीत एका गटाने चाकू हल्ला केला. इतकंच नाही तर बेदम मारहाणही करण्यात आली. या घटनेचे व्हिडीओसुद्धा समोर आले आहेत. चाकू हल्ल्यानंतर तिघे जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. स्थानिकांनी त्यांना उचलून रुग्णालयात नेले. घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.

- Advertisement -

मृत आणि जखमींची नावं

या हल्ल्यात जुबेर शोएब शेख ( वय 46), इस्तियाक शोएब शेख (वय 32), अबू हमजा शेख, आसिफ वहाब शेख ( वय, 36), साजिद वहाब शेख ( वय 33), शेहबाज सोहेल शेख ( वय 34), नोयेब सोहेल शेख हे गंभीर जखमी झाले असून यापैकी जुबेर शोएब शेख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे.

(हेही वाचा: Lok Sabha Election 2024 : उन्मेष पाटील ठाकरे गटात; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -