घरमहाराष्ट्रSushma Andhare : लेक लाडकीचा ढोल वाजवणारे कुठल्या बिळात लपून बसलेत? अंधारेंकडून...

Sushma Andhare : लेक लाडकीचा ढोल वाजवणारे कुठल्या बिळात लपून बसलेत? अंधारेंकडून फडणवीस लक्ष्य

Subscribe

मुंबई : अहमदनगरच्या संगमनेर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. आपली बदनामी होईल, या भीतीने तिने विषप्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.

हेही वाचा – Thackeray group : …म्हणून शिवसेनेला ही वाट स्वीकारावी लागली, ठाकरे गटाचे भाजपावर शरसंधान

- Advertisement -

संगमनेरमध्ये इयत्ता 10वीमध्ये शिकणारी एक 15 वर्षीय मुलगी 29 फेब्रुवारीला सकाळी परीक्षेची रिसीट आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. यावेळी सौरभ खेमनर याने तिला जबरदस्तीने एका पान शॉपमध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केले. यावेळी योगेश खेमनर याने पान शॉपचे शटर बंद करून बाहेरून कुलूप लावले होते. तर, प्रशांत खेमनर आणि विजय खेमनर हे पान शॉपच्या बाहेर उभे होते.

- Advertisement -

या घटनेनंतर गावात आपली बदनामी होईल, या भीतीने पीडित मुलीने विषप्राशन करून आत्महत्या केली. याबाबत मुलीच्या नातेवाइकांनी रविवारी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सौरभ खेमनर, योगेश खेमनर, प्रशांत खेमनर तसेच विजय खेमनर यांच्यासह विकास गुंड याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम 376(3), 109, 306, 506, 34 तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम 4, 8, 12, 17, 21अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – Thackeray group : …तर भाजपाचे दुकान एका रात्रीत बंद पडेल, ठाकरे गटाचा टोला

या प्रकरणाची फिर्याद सोशल मीडियावर शेअर करत सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आरोपी नराधमांची नावे माहीत असूनही अद्याप अटक झालेली नाही. लेक लाडकीचा ढोल वाजवणाऱ्या आणि बेटी बचाव बेटी पढाव म्हणणारे कुठल्या बिळात लपून बसले आहेत? असा प्रश्न त्यांनी केला आहे.

हेही वाचा – INDIA Vs NDA : मुंबईतील एका सभेनेच हुकूमशहांच्या 70 जागा कमी केल्या, ठाकरे गटाचा निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -