घरदेश-विदेशReliance Family Day: पुढील वारसदार कोण असेल? मुकेश अंबानींनी स्पष्टच सांगितलं

Reliance Family Day: पुढील वारसदार कोण असेल? मुकेश अंबानींनी स्पष्टच सांगितलं

Subscribe

देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रिलायन्स कौटुंबिक दिनानिमित्त कंपनीचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या वारसाबद्दल आपले मत व्यक्त केले.

मुंबई:देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रिलायन्स कौटुंबिक दिनानिमित्त कंपनीचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या वारसाबद्दल आपले मत व्यक्त केले. गुरुवार 28 डिसेंबर रोजी धीरूभाईंची जयंती देखील आहे आणि त्यानिमित्त रिलायन्सच्या अध्यक्षांनी कंपनीच्या भविष्यातील योजना आणि रोडमॅपबद्दल सांगितले. (Reliance Family Day Who will be the next heir Mukesh Ambani said clearly)

धीरूभाई अंबानींची आठवण

धीरूभाई अंबानींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रिलायन्स फॅमिली डे कार्यक्रमात आपल्या भाषणादरम्यान, मुकेश अंबानी यांनी प्रामाणिकपणा, उत्कृष्टता, सहकार्य आणि चांगल्या भविष्यासाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली. यासोबतच त्यांनी रिलायन्सबाबत संस्थापक धीरूभाईंनी प्रस्थापित केलेली मूल्ये जपण्याचे वचन दिले. ते म्हणाले की, आम्ही उच्च मापदंड प्रस्थापित करण्याचे धाडस दाखवले आहे, तसेच नवे विक्रम रचण्यासाठी आणखी उंच झेप घेण्याची क्षमता दाखवली आहे, असे करून रिलायन्सचा विकास साधला आहे.

- Advertisement -

आम्हाला भारतमातेची आणि प्रत्येक भारतीयाची काळजी

रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, आज व्यवसायासाठी देशांतर्गत आणि जागतिक वातावरण अतिशय वेगाने बदलत आहे. यात समाधानी राहण्याला जागा नाही आणि रिलायन्स याआधीही मिळालेल्या यशाबाबत समाधानी नव्हतं आणि भविष्यातही रिलायन्स कधीच समाधानी न होता अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहणार आहे. अंबानी म्हणाले की, आम्हाला पृथ्वीची आणि मानवतेची काळजी आहे. तसंच, भारत मातेची आणि प्रत्येक भारतीयाची काळजी आहे. यासोबतच अंबानी यांनी रिलायन्सच्या वाढीसाठी बांधिलकी आणि ‘विकास हेच जीवन’ या ब्रीदवाक्याचा पुनरुच्चार केला.

रिलायन्स जगात ‘या’ स्थानावर पोहोचेल

रिलायन्सच्या भविष्याविषयी बोलताना मुकेश अंबानी म्हणाले, भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, तेव्हा रिलायन्ससाठी एक अभूतपूर्व संधी वाट पाहत आहे. रिलायन्स हे करू शकते आणि रिलायन्स हे करेल आणि येणा-या काळात ते जगातील टॉप-10 व्यावसायिक गटांपैकी एक बनेल.

- Advertisement -

‘माझी टीम… माझी रिचार्ज बॅटरी’

मुकेश अंबानी यांनी रिलायन्समध्ये दोन दशकांहून अधिक काळ काम केलं आहे आणि सांगितले की या कंपनीचे नेतृत्व करण्याचा आम्हाला अभिमान आहे. रिलायन्स संस्थेमध्ये प्रचंड प्रतिभा आहे आणि आमचे यश अत्यंत प्रतिभावान व्यक्तींच्या सैन्याने चालवले आहे जे दररोज प्रचंड योगदान देतात. अंबानी म्हणाले की, माझी टीम ही माझी रिचार्ज बॅटरी आहे. मुकेश अंबानी यांनी भविष्यासाठी तीन मुद्द्यांबद्दल सांगितले आणि म्हणाले, डिजिटल डेटा प्लॅटफॉर्म आणि एआयचा अवलंब करण्यामध्ये जागतिक स्पर्धकांमध्ये रिलायन्सचे स्थान मजबूत करण्याची गरज आहे, असं मुकेश अंबानी म्हणाले.

(हेही वाचा: Canada : हिंदू मंदिरांवर हल्ला करणारा गजाआड, द्वेषमूलक गुन्हे नसल्याचे पोलिसांकडून स्पष्टीकरण)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -