घरमहाराष्ट्रArvind Kejriwal Arrested : भाजपा घाबरलीय, आज ही परिस्थिती असेल तर...; आत्या-भाच्याचे...

Arvind Kejriwal Arrested : भाजपा घाबरलीय, आज ही परिस्थिती असेल तर…; आत्या-भाच्याचे सरकारवर टीकास्त्र

Subscribe

नवी दिल्ली : दिल्‍ली मद्य धोरण प्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी करणारी याचिका दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्‍च न्‍यायालयात केली होती. यावर गुरुवारी (21 मार्च) सुनावणी झाली. या सुनावणीत केजरीवाल यांना कठोर कारवाईपासून कोणतेही अंतरिम संरक्षण देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर काही तासातच ईडीचे पथक थेट केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि दोन तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. केजरीवालांच्या अटकेनंतर इंडिया आघाडी एकजूट झाली असून त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहेत. शरद पवार यांची कन्या, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. (Arvind Kejriwal Arrested BJP is scared Grand-nephews criticism of the government)

हेही वाचा – Arvind Kejriwal Arrested : केजरीवालांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; ईडी दाखल करू शकते हेरगिरीचा गुन्हा

- Advertisement -

केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करताना सुप्रिया सुळे यांनी ट्विटरमध्ये म्हटले की, मी याप्रसंगी अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर उभी आहे. राजकीय हेतूने प्रेरीत अटक झाली आहे. ईडीने ही अटक विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात मतदारांना कमी लेखण्याच्या उद्देशाने भाजपा सरकारच्या आदेशानुसार केली आहे. आम्ही संवैधानिक लोकशाहीसाठी या लढ्यात एकत्र आहोत, असं सुप्रिया यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Modi Bhutan Visit : पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी भूतानचे नागरिक रस्त्यावर; 45 किलोमीटरपर्यंत लागल्या रांगा

भाजपा घाबरलीय

रोहित पवार यांनी ट्वीट करताना म्हटले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक ही अहंकाराचा कहर आहे. आज ही परिस्थिती असेल तर चुकून 2024 ला भाजपा सत्तेत आली तर संविधान आणि लोकशाही हे सर्वांना विसरावं लागेल. या काळात अरविंद केजरीवाल यांच्यासोबत महाराष्ट्राचीही स्वाभिमानी मराठी जनता आहे. मात्र या कारवाईवरून एक स्पष्ट झालं की, भाजपा घाबरली आहे. लडेंगे और जितेंगे असा हॅशटॅगही रोहित पवार यांनी ट्वीट करताना वापरला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -