Monday, April 22, 2024
घरमानिनीHealthPlastic Water Bottles : प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता का?

Plastic Water Bottles : प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता का?

Subscribe

आपण बाहेर गेल्यावर कायम प्लास्टिकची पाण्याची बाटली सोबत ठेवतो किंवा विकत घेतो. पण अशा प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणं आपल्या आरोग्यासाठी कितपत चांगलं असतं? याचा आपण फारसा विचार करत नाही. प्लास्टिकचा वापर मानवी शरीरासाठी किती घातक ठरू शकतो हे जाणून घेणे खुप गरजेचे आहे. त्यातून निघणारी रसायने शरीराला कितपत हानी पोहोचवू शकतात आणि निसर्गाची तसेच मानवी शरीराची किती प्रमाणात हानी करतात. हे जाणून घेऊयात.

प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिण्याचे तोटे
प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी प्यायल्याने तुमची तहान तर शमतेच, पण त्याचा शरीरावरही लक्षणीय परिणाम होतो. एक घोट पाणी शरीरात जाते, त्यासोबत मायक्रोप्लास्टिक्स देखील शरीरात पोहोचतात. मायक्रोप्लास्टिक्स हे प्लॅस्टिकचे छोटे तुकडे असतात, जे 5 मिलिमीटरपेक्षा लहान असतात. प्लास्टिक असल्याने हे तुकडे शरीरात सहज पचत नाहीत आणि शरीरात जमा होऊ लागतात. त्याचा परिणाम शरीरावर दीर्घकाळानंतर दिसून येत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

अनेक प्रकारच्या प्लास्टिक बिसफेनोल ए (BPA) हे एक घातक रसायन आहे. हे पाण्यासोबत मिसळून शरीरात गेल्यास हानीकारक ठरू शकतं. त्यामुळे पाण्यासाठी बाटली विकत घेताना ती BPA विरहीत असेल, याकडे लक्ष द्या. बहुतेक प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA असतं. त्यामुळे काचेची बाटली उपयोगी ठरू शकते.

शरीरासाठी घातक
प्लास्टिकच्या बाटलीत खूप वेळ पाणी ठेवले जाते. ते पाणी एखाद्या व्यक्तीने प्यायल्यास, त्या व्यक्तीला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. यामुळे पुरुषांमध्ये हार्मोनल गडबड होऊ शकते. तसेच स्पर्म काऊंटही कमी होतो आणि लिव्हरचे (यकृत) गंभीर नुकसान होऊ शकते. एवढेच नव्हे तर प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो.प्लास्टिकच्या बाटल्यांमधून बाहेर पडणारी रसायने आपल्या शरीरात प्रवेश करतात. यामुळे प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्तीवर मोठा परिणाम होतो.

- Advertisement -

जर तुम्हाला या सर्व समस्यांपासून दूर राहायचं असेल महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिक बॉटलने पाणी पिणे टाळावे. कारण प्लास्टिक बॉटलने पाणी पिणे शरीरासाठी आणि विशेष म्हणजे आरोग्यासाठी योग्य नसतं. त्यापेक्षा काचेच्या किंवा तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे योग्य असते.

_______________________________________________________________________

हेही पहा : मसालेदार पदार्थांमुळे पोटात जळजळतंय? 

- Advertisment -

Manini