Thursday, May 9, 2024
घरमानिनीHealthडायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' स्टेप्स

डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Subscribe

डायबिटीस आजकाल सामान्य झाला आहे. आजकाल वृद्ध, तरुण इतकेच काय लहान मुलेही डायबिटिसला बळी पडत आहेत. डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी योग्य दिनचर्येची गरज असते. या दिनचर्येत योग्य आहार ते व्यायाम यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. डायबिटीस पूर्णपणे बरा होऊ शकत नाही मात्र, औषधे आणि इतर गोष्टींनी कंट्रोलमध्ये ठेवता येतो. यासह वेळोवेळी तपासण्याही करणे गरजेचे असते.

डायबिटिस कंट्रोलमध्ये नसेलतर शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात शिवाय शरीराच्या इतर कार्यावरही याचा परिणाम होतो. जर तुम्हाला डायबिटीस असेल आणि तो तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर तज्ज्ञांनी दिलेल्या काही टिप्स फॉलो करणे आवश्यक आहे. या स्टेप्सच्या मदतीने तुम्ही डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेऊ शकता.

- Advertisement -

डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या स्टेप्स –

1.डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी 12 तासांची उपवास विंडो महत्वाची भूमिका बजावते. याच अर्थ असा की जर तुम्ही रात्री 8 वाजता जेवले असाल तर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता नाश्ता करा. तसेच नाश्ता आणि रात्रीचे जेवण यादरम्यान काहीही खाऊ नका.

- Advertisement -

2.या स्टेप्समुळे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते आणि शरीर अधिक प्रभावीपणे इन्सुलिन वापरण्यास सक्षम होते.

3.जेवण झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटे अवश्य चाला. असे केल्याने पचनसंस्थेतील अन्नाची हालचाल सुधारेल. परिणामी, सूज आणि अपचन होणार नाही.

4.अन्नपदार्थ खाताना फायबर, प्रोटीन आणि नंतर कार्ब्सच्या अनुक्रमाने खा. हे रक्तातील साखरेची वाढ रोखते आणि रक्तातील साखरेची पातळी रोखण्यास मदत करते.

5.सोल्स पुश अप्स करा. याने रक्तातील साखरेची पातळी कंट्रोलमध्ये राहते.

6.डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मंडूकासान उपयुक्त ठरते. मंडूकासान डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यास अत्यंत प्रभावी असते. त्यामुळे पेशींमध्ये ग्लुकोज चांगल्यारितीने शोषले जाते. परिणामी, पॅनक्रियाजचे कार्य सुधारते.

7.एकाच वेळी पोटभर जेवण्याऐवजी, ठराविक अंतराने थोडे – थोडे जेवण करा. यामुळे पेशींना ग्लुकोज शोषण्यास वेळ मिळतो आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते.

8.डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी दररोज ब्लॅकबेरीजच्या बियांचे पाणी अवश्य प्या. यात जांबोलीन असते. जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचे काम करते.

 

 


हेही वाचा : कॉलेस्ट्रॉल नैसर्गिकरीत्या कमी कसे कराल?

 

- Advertisment -

Manini