Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthकॉलेस्ट्रॉल नैसर्गिकरीत्या कमी कसे कराल?

कॉलेस्ट्रॉल नैसर्गिकरीत्या कमी कसे कराल?

Subscribe

हृदयविकाराचे मुख्य कारण म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल. जेव्हा रक्तातील कोलेस्ट्रॉल नावाच्या फॅटी पदार्थाचे प्रमाण खूप जास्त होते तेव्हा शरीरात हाय कोलेस्ट्रॉल वाढते. हाय कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्या ब्लॉक करू शकतात. यामुळे हृदयाच्या समस्या किंवा पॅरालिसिस होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. याकडे दुर्लक्ष करणे हृदयावर परिणाम होण्यासोबतच अनेक गंभीर समस्यांना निमंत्रण देऊ शकते.

कोलेस्ट्रॉलची लेवल का वाढते?

- Advertisement -

कोलेस्ट्रॉलची लेवल प्रामुख्याने चरबीयुक्त पदार्थ खाणे, पुरेसा व्यायाम न करणे, वजन जास्त असणे, धूम्रपान किंवा दारू पिणे यामुळे वाढते. याशिवाय कौटुंबिक इतिहासामुळे सुद्धा कोलेस्ट्रॉलची समस्या उद्भवू शकते. हाय कोलेस्टरॉलमुळे सहसा कोणतीही लक्षणे उध्दभवत नाही. हे केवळ रक्त तपासणीद्वारे शोधले जाऊ शकते. सकस आहार आणि व्यायाम करून कोलेस्ट्रॉल कमी करता येऊ शकते. काही काहींना औषधे घेण्याची गरज भासू शकते.

कॉलेस्ट्रॉल नैसर्गिकरीत्या कमी कसे कराल?

- Advertisement -

कमी चरबीयुक्त पदार्थ खा –
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी चरबीयुक्त पदार्थ कमी खाण्याचा प्रयन्त करा. विशेषतः सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

या पदार्थांचे सेवन करा –
तेलकट मासे जसे की, मॅकरेल आणि साल्मन
ब्राऊन राईस, गव्हाचा पास्ता
नट्स आणि बिया
फळे आणि भाज्या

हे पदार्थ खाऊ नयेत-
प्रक्रिया केलेले मांस, सॉसेज आणि फॅटी मीट
क्रीम आणि हार्ड चीज
केक आणि बिस्किट्स
खोबरेल तेल किंवा पामतेल असलेले पदार्थ

व्यायाम करा –
आठवड्यातून किमान १५० मिनिटे व्यायाम करण्याचे लक्ष ठेवा. व्यायाममध्ये तुम्ही सुरुवातील चालणे, पोहणे, जॉगिंग, सायकलिंग आदी प्रकार करू शकता. कोलेस्ट्रॉलची लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्यास व्यायाम अत्यंत उपयुक्त ठरते.

कायम हसत राहा –
हसणे हे औषधासारखे आहे. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हसणे फायद्याचे ठरते. तणावयुक्त आयुष्यात हलकेफुलके विनोदाचे व्हिडीओ अवश्य पहा, सतत स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयन्त करा. तुम्हाला हसवणारे चित्रपट किंवा कार्यक्रम नक्की पहा.

धूम्रपान टाळा –
धुम्रपानामुळे कोलेस्ट्रॉलची लेवल वाढू शकते. अशाने हार्ट अटॅक, पॅरलिसिस, कॅन्सर यांसारख्या गंभीर समस्या होण्याची शक्यता निर्माण होते. तुम्हाला धूमपानची सवय सोडायची असेल तर तुम्ही विविध उपाय करून किंवा एखाद्या तज्ज्ञाची मदत घेऊन धूम्रपानाचे व्यसन सोडू शकता.

मद्यपान टाळा –
कोलेस्ट्रॉलची लेवल वाढण्यामागे मद्यपान हे सुद्धा कारण असू शकते. यासाठी अल्कोहोल पिण्याची सवय सोडायला हवी.

 

 

 


हेही वाचा : हृदयालाही असते डिटॉक्सची गरज

 

- Advertisment -

Manini