Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchenRecipe : महाशिवरात्रीच्या उपवासाला बनवा साबुदाणा-सफरचंद खीर

Recipe : महाशिवरात्रीच्या उपवासाला बनवा साबुदाणा-सफरचंद खीर

Subscribe

उपवासाच्या काळात बरेच जण साबुदाणा खिचडी खाण्यास पसंती देतात, पण कधी कधी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही साबुदाणा, सफरचंदाची पौष्टिक खीर नक्की खाऊन बघा.

साहित्य :

  • 1/2 कप साबुदाणा
  • 1/2 कप सफरचंद (चुरडलेले)
  • 6 कप दूध
  • 1 कप साखर
  • 1/4 कप डाळिंबाचे दाणे
  • 1/4 कप मिक्स ड्राई फ्रूट्स
  • 8-10 केसराचे तुकडे
  • 8-10 कापलेले सफरचंद
  • 1 चमचा वेलची पाउडर

कृती :

- Advertisement -

 

  • सर्वप्रथम साबुदाणा 4-5 तास भिजवून ठेवा.
  • त्यानंतर एका पातेल्यात दूध गरम करून घ्या, दूध उकळल्यानंतर त्यामध्ये साबुदाणा टाकून 2 मिनिट शिजवून घ्या.
  • ठरावीक वेळेनंतर गॅस मंद आचेवर ठेवून दुधामध्ये चुरडलेले सफरचंद आणि ड्राई फ्रूट्स टाकून मिक्स करून घ्या.
  • आता त्यामध्ये चवीनुसार साखर आणि वेलची पावडर टाकून 2 मिनिटे मिक्स करून घ्या.
  • ठराविक वेळेनंतर गॅस बंद करा.
  • तयार साबुदाणा-सफरचंद खीरीवर केसर, मिक्स ड्राय फ्रूट्स आणि कापलेले सफरचंदाचे तुकडे टाकून सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : टेस्टी ओट्स खीर

- Advertisment -

Manini