घरदेश-विदेशHealth : तपासण्या घटल्यामुळे उच्च रक्तदाब, हृदविकाराच्या आलेखात वाढ; अहवालातून माहिती समोर

Health : तपासण्या घटल्यामुळे उच्च रक्तदाब, हृदविकाराच्या आलेखात वाढ; अहवालातून माहिती समोर

Subscribe

कोरोनासारख्या महामारीनंतर देशासह राज्यातील नागरिकांना अनेक आजारांनी ग्रासले आहे. अशातच आता कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मानसिक आरोग्य आणि असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत असल्याची माहिती समोर येत आहे. एका खासगी रुग्णालयाने जारी केलेल्या वार्षिक 'हेल्थ ऑफ नेशन' अहवालातील मुख्य निष्कर्षात ही माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली : कोरोनासारख्या महामारीनंतर देशासह राज्यातील नागरिकांना अनेक आजारांनी ग्रासले आहे. अशातच आता कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मानसिक आरोग्य आणि असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत असल्याची माहिती समोर येत आहे. एका खासगी रुग्णालयाने जारी केलेल्या वार्षिक ‘हेल्थ ऑफ नेशन’ अहवालातील मुख्य निष्कर्षात ही माहिती समोर आली आहे. (Health increase in high blood pressure heart disease graph due to decrease in checks Information from the report)

जागतिक आरोग्य दिनानिमित्त अपोलो हॉस्पिटलने जारी केलेल्या ‘हेल्थ ऑफ नेशन’ या वार्षिक अहवालात भारतात
असंसर्गजन्य आजारांमध्ये वाढ झाल्याचे आढळले आहे. ‘हेल्थ ऑफ नेशन’ अहवालानुसार भारतात कर्करोगाचे निदान होण्याचे सरासरी वय इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. भारतात स्तनाच्या कर्करोगाच्या निदानाचे सरासरी वय 52 वर्षे आहे, तर युनायटेड स्टेट्स आणि युरोपमध्ये वय 63 वर्षे आहे. भारतात फुप्फुसाच्या कर्करोगाच्या निदानाचे सरासरी वय 59 वर्षे, तर पाश्चात्त्य देशांमध्ये सरासरी वय 70 वर्षे आहे. तर प्री-डायबिटीस, प्री -हायपरटेन्शन आणि लहान वयात मानसिक आरोग्याच्या समस्याही वाढल्या आहेत. असे असले तरी भारतात या आजारांच्या तपासणीचे प्रमाण कमी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Heart Health : हेल्दी ह्रदयासाठी वापरा हे कुकींग ऑईल 

‘हेल्थ ऑफ नेशन’च्या अहवालानुसार, भारतात आरोग्य तपासणीत वाढ करण्याची गरज आहे. लोक पूर्वीपेक्षा अधिक व्यापक आरोग्य तपासणीची निवड करत आहेत, जे आरोग्याच्या संरक्षणाच्या दिशेने सकारात्मक पाऊल आहे. मात्र असंसर्गजन्य रोगांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषत: गेल्या काही दशकांमध्ये, जागतिक आरोग्य परिदृश्यात एक गंभीर बदल दर्शवत आहेत. ज्यामुळे व्यक्ती, समुदाय आणि राष्ट्रांसमोर गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत, असे रुग्णालयाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मधु शशिधर यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

कर्करोग तपासणीचे प्रमाण कमी

भारतात कर्करोग वाढत असूनही तपासणीचे प्रमाण खूपच कमी असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतात स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीचे प्रमाण फक्त 1.9 टक्के आहे. तर अमेरिकेत 82, ब्रिटनमध्ये 70, तर चीनमध्ये 23 टक्के आहे. तर भारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या तपासणीचे प्रमाण 0.9 टक्के आहे. मात्र भारताच्या तुलनेत गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या तपासणीचे प्रमाण अमेरिकेत 73 टक्के, ब्रिटनमध्ये 70 आणि चीनमध्ये 43 टक्के आहे.

हेही वाचा – विसरायला होतं ? करा ही योगासने

अहवालातील महत्त्वाची निरीक्षणे

  1. प्रत्येक 4 पैकी 3 व्यक्ती लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. 2016 मध्ये लठ्ठपणाचे प्रमाण 9 टक्के होते, मात्र आता 2023 मध्ये लठ्ठपणाचे प्रमाण 20 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे.
  2. प्रत्येक 3 पैकी 2 भारतीय व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब वाढताना दिसत आहे. 66 टक्के प्री-हायपरटेन्सिव्ह अवस्थेत आहेत.
  3. 2016 मध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण 9 टक्के होते, मात्र आता 2023 मध्ये 13 टक्क्यांनी वाढले आहे.
  4. 10 पैकी एका व्यक्तीला अनियंत्रित मधुमेह आहे, तर 3 पैकी 9 व्यक्तींना प्री डायबेटिक आहे.
  5. 45 वर्षाखालील 5 पैकी एका व्यक्तीला प्री-डायबेटिक आहे.
  6. 18 ते 25 वयोगटातील व्यक्तींमध्ये नैराश्याची टक्केवारी सर्वाधिक आहे. या वयोगटातील 5 पैकी 9 जण निराश आहेत.
  7. 4 पैकी एका व्यक्तीला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (OSA) चा धोका आहे. तर ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया धोका स्त्रियांपेक्षा पुरुषांना दुप्पट असतो.
  8. तणावामुळे उच्च रक्तदाबाचा धोका 1.5 पटीने वाढतो. तर स्त्रियांमध्ये मधुमेहाचा धोका 2 पट आणि पुरुषांमध्ये 3 पटीने वाढतो.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -