घरमनोरंजनअनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्यात रंगली ऐश्वर्या

अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्यात रंगली ऐश्वर्या

Subscribe

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्याआधी, अंबानी कुटुंबाने 1 मार्च ते 3 मार्च या कालावधीत जामनगरमध्ये एका भव्य प्री-वेडिंग पार्टीचे आयोजन केले होते. तीन दिवस चाललेल्या या सेलिब्रेशनमध्ये बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंत आणि देशातील आणि जगातील सर्व बड्या व्यक्तींनी सहभाग घेतला.

सेलिब्रेशनच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 3 मार्चला बच्चन कुटुंबही जामनगरला पोहोचले. अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन त्यांची मुलगी आराध्या बच्चनसोबत सेलिब्रेशन एन्जॉय करताना दिसत आहेत.

अभिषेक बच्चनने ऐश्वर्या व लेकीसह केलं एंजॉय

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

- Advertisement -

मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन हिरव्या रंगाच्या पोशाखात  दिसत आहेत. यादरम्यान आई ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या संगीतावर टाळ्या वाजवताना खूप एन्जॉय करताना दिसत आहेत, तर अभिषेकही या दोघांसोबत सेलिब्रेशन एन्जॉय करताना दिसत आहे.

- Advertisement -

अभिषेक आणि ऐश्वर्याने विभक्त झाल्याच्या अफवा फेटाळून लावल्या

अनंत-राधिकाच्या लग्नाआधीच्या समारंभात एकत्र येण्यापासून ते एकत्र सेलिब्रेशनला हजर राहण्यापर्यंत, अभिषेक आणि ऐश्वर्याने पुन्हा एकदा त्यांच्या विभक्तीच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. खरं तर, याआधी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की अभिषेक आणि ऐशचे वैवाहिक जीवन चांगले चालले नाही आणि ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत तिच्या आईच्या घरी शिफ्ट झाली आहे. मात्र ऐश्वर्या आणि अभिषेक अनेकदा एकत्र दिसले आहेत आणि त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवा चुकीच्या असल्याचे सिद्ध करत आहेत. काही दिवसाआधी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांचा डेब्यू चित्रपट ‘द आर्चीज’च्या स्क्रीनिंगवेळी दोघं एकत्र दिसले होते.

दरम्यान, अनंत अंबानींचा प्री-वेडिंग सोहळा जामनगरमध्ये धूमधडाक्यात पार पडला. या भव्य सोहळ्यात जगभरातून एक हजारहून अधिक पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. बॉलीवूड सेलिब्रिटींसह जगभरातील प्रतिष्ठित पाहुण्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. रविवारी या प्री-वेडिंग सोहळ्याचा समारोप झाला.

अलीकडेच अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याने केली होती पोस्ट शेअर

अभिषेक बच्चनच्या वाढदिवसाच्या दिवशी ऐश्वर्याने इंस्टाग्रामवर एक सुंदर पोस्टही शेअर केली होती. पहिला फोटो अभिषेकच्या बालपणीचा होता तर दुसऱ्या फोटोत अभिषेक आणि ऐश्वर्या त्यांची मुलगी आराध्यासोबत दिसत होते. हा फोटो शेअर करताना ऐश्वर्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “तुला खूप आनंद, प्रेम, शांती आणि उत्तम आरोग्य मिळो, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -