घरमहाराष्ट्रमोठी बातमी: प्रकाश आंबेडकरांकडून एकला चलो रे चा नारा; उमेदवारांची यादी जाहीर

मोठी बातमी: प्रकाश आंबेडकरांकडून एकला चलो रे चा नारा; उमेदवारांची यादी जाहीर

Subscribe

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कालच (मंगळवारी) त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता ते मविआसोबत राहणार की स्वतंत्र निवडणूक लढवणार की इतरांना एकत्र करत आपलीच एक आघाडी निर्माण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आंबेडकर यांनी स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली आहे. ते ओबीसी महासंघाशी युती करणार आहेत. (Big News Ekla Chalo Re Chant from Prakash Ambedkar Will fight from Akola)

मविआकडून प्रकाश आंबेडकरांना 5 जागांची ऑफर देण्यात आली होती. अनेकदा त्यांच्यात बैठका झाल्या आहेत. अनेक जागांवर चर्चाही झाल्या होत्या. परंतु असं असतानाही, प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलो रे चा नारा दिला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

काल, मंगळवारी महाराष्ट्र राज्य समितीची बैठक झाली. या बैठकीत मनोज जरांगेंसोबतही सविस्तर चर्चा झाली. 30 मार्चला जरांगे पाटील आपल्या समाजाशी बोलून निवडणूक लढवणार की नाही याबाबत आपला निर्णय सांगणार आहेत, अशी माहिती आंबेडकर यांनी दिली आहे.

आंबेडकर ओबीसी महासंघाशी युती करणार आहेत. ओबीसी, मुस्लीम, जैन समाजाच्या लोकांना उमेदवारी दिली जाईल. तसंच, अधिकाधिक गरिबांना उमेदवारी दिली जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

नवीन आघाडी निर्माण

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना जरांगे पाटलांचा पाठिंबा आहे. आम्ही नवीन आघाडी तयार करत आहोत. जरांगे पाटलांच्या फॅक्टरकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, असं आम्ही मविआला सांगितलं होतं. मात्र, त्यांनी लक्ष दिलं नाही. वंचितचा वापर ते घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते. त्यामुळे आम्ही आता वेगळा निर्णय घेत आहोत. या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका होणार आहे, हे मला माहीत आहे. मात्र मी लोकांची नस ओळखतो, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

वंचितची उमेदवारी यादी जाहीर 

  • भंडारा-गोंदिया- संजय गजानन केवट
  • गडचिरोली- चिमूर- हितेश पांडूरंग मडावी
  • चंद्रपूर- राजेश वारलूजी बेले
  • बुलढाणा- वसंत मगर
  • अकोला- प्रकाश आंबेडकर
  • वर्धा- राजेंद्र साळुंखे
  • अमरावती- प्राजक्ता पिल्लेवान
  • यवतमाळ-वाशिम- खेमसिंग पवार

( हेही वाचा: Burning Train : मुंबईच्या दिशेने येणाऱ्या होळी स्पेशल ट्रेनच्या एसी बोगीला आग )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -