घरमहाराष्ट्रMahayuti : रिपाइंला झालेली जखम कशी भरून काढणार? रामदास आठवलेंचा फडणवीसांना सवाल

Mahayuti : रिपाइंला झालेली जखम कशी भरून काढणार? रामदास आठवलेंचा फडणवीसांना सवाल

Subscribe

मुंबई : उपमख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात महायुतीची सर्व सूत्रे हाती घेऊन काम करत आहेत. भाजपा-शिवसेना आणि रिपाइं यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आल्याने महायुतीचा कंस हा महिरपी कंस झाला. आता महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सामावून घेताना महायुतीच्या जागावाटपाचे गणित कसे बसवणार? हे गणित फडणवीस लीलया सोडवतील याची खात्री आहे. पण रिपाइंला झालेली जखम तुम्ही कशी भरून काढणार? असा प्रश्न केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विचारला आहे.

हेही वाचा – Loksabha 2024: ठाकरेंनी शड्डू ठोकलाच! सांगलीसह 17 जागांची यादी जाहीर; काँग्रेसची कोंडी

- Advertisement -

रामदास आठवले यांच्यावतीने रिपाइंचे प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र लिहिले आहे. शिवसेना-भाजप युतीला रामदास आठवले यांच्या रिपाइंने साथ दिल्यामुळेच युतीची महायुती झाली. रामदास आठवले राज्यभर भाजपा अन् देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे चांगले नेते आहेत, ते कसे संविधानप्रेमी आहेत, हे जनतेला समजावत रामदास आठवले हे मोदी यांचे समर्थन करीत आहेत. मग महायुतीमध्ये नवनवे पक्ष घेऊन भाजपा आपल्या पायावर धोंडा मारून घेत आहात. मनसेकडे जाण्याची अवदसा फडणवीस यांना का सुचली, असा प्रश्न रिपाइंने विचारला आहे.

हेही वाचा – Thackeray Group : एक पक्षप्रवेश अन् कोळशाचे डाग धुतले गेले; उद्धव गटाची भाजपवर सडकून टीका

- Advertisement -

गायीचा चारा गाढवाला देऊ नका

मनसे आणि राज ठाकरे हे भाजपा, मोदी आणि महायुतीवर तुटून पडत असताना रामदास आठवले धावून येत असत. भाजपा आणि मोदी यांचे सर्वाधिक समर्थन करणारा महायुतीचा नेता रामदास आठवले असून त्यांच्यासारखा मित्रधर्म पाळणारा नेता कोणी नाही. पण फडणवीस मात्र आज रामदास आठवले यांच्यासारख्या कोहिनूर हिऱ्याकडे दुर्लक्ष करून गारगोट्या गोळा करीत आहेत. गायीचा चारा गाढवाला देत आहेत. चोर सोडून सन्याशाला फाशी देऊ नका, ही जनतेची भावना तुम्ही ओळखावी, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

रिपाइंच्या नावाचाही उल्लेख नाही

महायुतीचा महिरपी कंस वाढवताना रिपाइंला वजा करण्याचे गणित करू नका. जे रिपाइंला सन्मान देतात त्यांचा 12चा वर्ग 144 होतो आणि जे धोका देतात त्यांचे रिपाइं 12 वाजवते, हा इतिहास आहे. विधानसभेत फडणवीस यांनी रिपाइंला जागा सोडल्या नाहीत. आता लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप होत असताना रिपाइंच्या नावाचाही उल्लेख होत नाही, अशी व्यथा या पत्रात त्यांनी मांडली आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : शिवसेना ठाकरे गट एकूण 22 जागा लढवणार; संजय राऊतांची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -