घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा; ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Politics : अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा; ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : मागील काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये मोठी फूट पडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर अगदी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी  आमदारकीसह 85-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते कोणत्या पक्षात जाणार अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी अशोक चव्हाण यांच्यासोबत 10 ते 12 आमदारांचा गटही भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Politics Ashok Chavan resigns from MLA First reaction from the Thackeray group Ambadas Danve)

हेही वाचा – Ashok Chavan : काँग्रेसला राज्यात मोठा धक्का! अशोक चव्हाणांच्या ‘हाता’त कमळ

- Advertisement -

अशोक चव्हाणांनी काँग्रेस आमदारकीच्या राजीनाम्याबाबत अंबादास दानवे यांना विचारले असता, ते म्हणाले की, या सर्व गोष्टीवर आताच मत व्यक्त करणं फार घाई होईल. कारण अशोक चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते शंकरराव चव्हाण याचे सुपुत्र आहेत. काँग्रेसची नाळ या महाराष्ट्राशी जोडण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर घाईने मत व्यक्त करणं चुकीचं आहे, असं अंबादास दानवे म्हणाले.

काँग्रेसच्या सदस्यत्वपदाचा राजीनामा त्यांनी का दिला असेल? या प्रश्नावर बोलताना अंबादास दावे म्हणाले की, काँग्रसे हा एक स्वतंत्र पक्ष आहे. त्यांच्या पक्षात काय चालतं हा अंतर्गत प्रश्न आहे. मी शिवसेनेचा नेता आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याविषयी त्यांच्या पक्षाचे नेतेच बोलू शकतील. पण मला असं वाटतं की, अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत, असे अंबादास दानवे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Ashok Chavan: अशोक चव्हाणांबाबत कानावर हात, पण काँग्रेसचे बडे नेते आमच्या संपर्कात; फडणवीसांचं सूचक वक्तव्य

अशोक चव्हाण भाजपामध्ये जात असतील तर महाविकास आघाडीसाठी एक मोठा धक्का असेल? या प्रश्नावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे, ते भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत, हे मी तुमच्याकडून ऐकत आहे. पण मला असं वाटतं की, राजकारणात फार घाई करणं योग्य ठरणार नाही. ज्या वेळेस खरोखर अशा गोष्टी होतील, त्यावेळेस त्यांच्यावर मत व्यक्त केलं जाईल, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलाताना दिली आहे.

अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार?

दरम्यान, अशोक चव्हाण यांचा मोबाईल फोन सध्या नॉट रिचेबल आहे. त्यामुळे नांदेडमध्ये काँग्रेसच्या वर्तुळात कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. विशेष म्हणजे नांदेडच्या चव्हाण समर्थकांकडून त्यांच्या भाजपा प्रवेशाचे पोस्ट व्हायरल होऊ लागल्या आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण हे भाजपामध्ये जातील किंवा भाजपामध्ये जाण्याचा विचार करत होते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. याच सर्व पार्श्वभूमीवर आता अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -