घरमहाराष्ट्रMaratha Reservation : जरांगेंची लढाई मराठ्यांसाठी नव्हती, त्यांना ओबीसी कोट्यातून...; बारसकरांचे पुन्हा...

Maratha Reservation : जरांगेंची लढाई मराठ्यांसाठी नव्हती, त्यांना ओबीसी कोट्यातून…; बारसकरांचे पुन्हा आरोप

Subscribe

मुंबई : राज्य सरकारने 20 फेब्रुवारी रोजी मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण जाहीर केले. यानंतर दुसऱ्याच दिवशी अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले होते. यानंतरही अजय बारसकर यांनी अनेकदा मनोज जरांगेंवर आरोप होते. अशातच आता मनोज जरांगे यांनी आरक्षणाचं आंदोलन निवडणुकीपर्यंत कसं भरकटवल यासाठी ही पत्रकार परिषद घेत असल्याचे म्हणत अजय बारसकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. मनोज जारांगे यांची लढाई गोरगरीब मराठ्यांसाठी आणि त्यांच्या लेकरबाळांसाठी नव्हती. तर त्यांना ओबीसीच्या कोट्यातून सरपंच व्हायचं होतं. यासाठीच मनोज जरांगे यांची ही लढाई होती, असे त्यांनी म्हटले आहे. (Maratha Reservation Manoj Jarangs fight was not for Marathas he wanted to become Sarpanch from OBC quota Ajay Baraskars allegations again)

हेही वाचा – Nashik Constituency : भाजपा-शिवसेनेत रस्सीखेच; तर भुजबळ म्हणतात, जागा आमच्यासाठी सुटत नाही तोपर्यंत…

- Advertisement -

अजय बारसकर म्हणाले की, मला काही लोकांनी सांगितलं, महाराज तुम्ही एक महिनाभर शांत रहा, त्यांना त्यांच्या पद्धतीने आंदोलन करू द्या म्हणून मी शांत होतो. पण आता मी शांत बसणार नाही. जरांगे यांच्यावर विश्वास होता म्हणून त्यांना एवढा मोठा पाठिंबा मिळाला, पण आता अश्या काही घटना घडत आहेत, ज्यामुळे मनोज जरांगे यांची विश्वासार्हता कमी झालेली आहे. जरांगे यांनी लोणावळ्यात बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे आरक्षणाचा लढा हा राजकीय लढा झाला आहे. अशोक चव्हाण  यांनी परवा रात्री नोज जरांगे यांची भेट घेतली आणि माध्यमांना प्रतिक्रियाही दिली. जरांगे म्हणाले होते की, सीएम आणि डीसीएमसोबत त्यांनी फेसटाईमवर चर्चा केली आणि त्यावेळी मोबाईलवर मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केलं. मग अशोक चव्हाण यांच्या भेटीवेळी काय चर्चा झाली, याचं रेकॉर्डिंग त्यांनी जगासमोर आणावे, असं आवाहन अजय बारसकर यांनी केले आहे.

हेही वाचा – Vijaypat Singhania : इच्छा नसतानाही…; विजयपत सिंघानियांनी गौतमसोबतच्या भेटीबाबत केला खुलासा

- Advertisement -

जरांगेंना ओबीसी कोट्यातून सरपंच व्हायचं होतं

मनोज जरांगेंवर गंभीर आरोप करताना अजय बारसकर म्हणाले की, मनोज जरांगे यांची लढाई गोरगरिब मराठ्यांसाठी आणि त्यांच्या लेकरबाळांसाठी नव्हती. त्यांना ओबीसीच्या कोट्यातून सरपंच व्हायचं होतं. त्यासाठी मनोज जरांगे यांची लढाई होती. त्यांनी जे काही सुरू केलं त्यानंतर मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाले. ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावली गेली. एकेक मराठा अपक्ष उमेदवार उभा करण्याची पहिली डील झाली आणि आता मविआसोबत दुसरी डील सुरू आहे. मविआचा उमेदवार असेल तिथे उमेदवार उभा करणार नाही ही दुसरी डील सुरू आहे, असा आरोपही बारसकर यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -