घरक्राइमViral Video Girls : स्टंटबाज मुलींना होणार अटक; दिल्लीच्या रस्त्यांवर सुरु होता...

Viral Video Girls : स्टंटबाज मुलींना होणार अटक; दिल्लीच्या रस्त्यांवर सुरु होता धिंगाणा

Subscribe

नवी दिल्ली – होळी खेळण्याच्या नावाखाली स्कूटरवर स्टंटबाजी करणाऱ्या दोन तरुणी आणि एका अज्ञाताचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ प्रकरणी आता नोएडा पोलीसांनी कडक पावले उचलली आहेत. पोलिसांनी या व्हिडीओत दिसणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांच्याही अटकेसाठी त्यांचा शोध सुरू केला आहे.

नोएडामध्ये धुळवडीच्या दिवशी एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये दोन मुली चालत्या स्कूटरवर स्टंट करत आहेत. एका स्कूटरवर तिघेजण जात आहेत. तरुण स्कूटर चालवत आहे. मागे बसलेल्या मुली एकमेकांना रंग लावत आहेत आणि सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करत आहेत. तिघेही हेल्मेटशिवाय आहेत. आजूबाजूला उभे असलेले लोक त्यांच्याकडे बघत होते, मात्र त्यांना कोणाचीही पर्वा दिसत नव्हती.

- Advertisement -
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे नोएडा पोलिसांनी तिघांविरुद्ध अश्लीलता पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे नोएडा पोलिसांनी तिघांविरुद्ध अश्लीलता पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला

तिघांविरुद्ध अश्लीलता पसरवल्याप्रकरणी गुन्हा

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ट्रॅफिक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्कूटर मालकाला 33 हजार रुपयांचे चलन बजावले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे नोएडा पोलिसांनी तिघांविरुद्ध अश्लीलता पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली जाणार असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी या तिघांचा शोध सुरू केला आहे. हा व्हिडिओ पोलिस स्टेशन सेक्टर 113 परिसरातील सेक्टर 78 मधील असल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हायरल व्हिडिओवर डीसीपी काय म्हणाले?

याप्रकरणी माहिती देताना डीसीपी विद्या सागर मिश्रा म्हणाले की, हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी नियमानुसार त्यांना चालान बजावले, तर व्हिडिओमध्ये दोन मुली आणि एक तरुण जे करत आहेत ते आयपीसीनुसार दंडनीय आहे. या प्रकरणी सेक्टर 113 पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -