घरमहाराष्ट्रMilind Deora यांच्या राजीनाम्यावर Sanjay Raut यांची प्रतिक्रिया, म्हणाले - "काँग्रेसने..."

Milind Deora यांच्या राजीनाम्यावर Sanjay Raut यांची प्रतिक्रिया, म्हणाले – “काँग्रेसने…”

Subscribe

काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रसचे नेते आणि मुंबईचे दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ज्यामुळे काँग्रेसला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या आधी मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. आगामी लोकसभेत महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळणार नसल्याने मिलिंद देवरा यांनी नाराजी व्यक्त करत हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. तर त्यांच्या या निर्णयाबाबत आता नेत्यांकडून मत व्यक्त करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. सध्या राज्यात सत्तेचे आणि खोक्याचे राजकारण सुरू आहे, असे सांगत त्यांनी मिलिंद देवरा यांनी घेतलेल्या निर्णयावर टीका केली आहे. (Sanjay Raut reacts to Milind Deora’s resignation)

हेही वाचा… Milind Deora यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, शिंदे गटात जाण्याची शक्यता

- Advertisement -

प्रसार माध्यमांनी संजय राऊत यांनी मिलिंद देवरा यांच्या शिवसेना शिंदे गटात जाण्याच्या निर्णयावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, हा महाराष्ट्र आहे, त्यामुळे जर कोणी निवडणुका लढवण्यासाठी किंवा एखाद्या पदासाठी पक्ष बदणार असतील तर ते महाराष्ट्राच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या परंपरेत सुरू झाले आहे. त्या परंपरेनुसार ते पक्ष बदलत आहेत. त्यावर काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी. मी कशाकरिता बोलू, माझ्या पक्षाशी त्याचा काहीही संबंध नाही. तर, अरविंद सावंत हे त्या लोकसभेचे विद्यमान खासदार आहेत. दोन वेळा ते निवडून आले आहेत. त्यामुळे जर का त्या लोकसभेतून अरविंद सावंत हे निवडणूक लढणार असतील, तर त्यात चुकीचे काय? असा प्रश्नही राऊतांकडून यावेळी उपस्थित करण्यात आला आहे.

तर, दक्षिण मुंबई लोकसभेची जागा ही परंपरेनुसार शिवसेना ठाकरे गटाची आहे. त्याच्यामुळे अरविंद सावंत हे त्या जागेवरून निवडणूक लढतील. मुंबईमध्ये जिथे जिथे शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत, त्या-त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढवतील आणि तिथून निवडून येतील, असेही संजय राऊत यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा यांना ओळखायचो. ते मोठे नेता होते. त्यांची काँग्रेससोबत असलेल्या निष्ठेबाबत आम्ही दाखले द्यायचो. पक्षासाठी काय केले पाहिजे. कसा त्याग करायला हवा, असे आम्ही सांगायचो, असेही यावेळी संजय राऊत यांच्याकडून प्रसार माध्यमांना सांगण्यात आले आहे. तर दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेसाठी कोणताही त्याग करणार नाही, अशी स्पष्ट भूमिकाही ठाकरे गटाकडून घेण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -